दाेघा मावस बहिणींना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाला पाेलीस काेठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 18:37 IST2021-07-04T18:33:47+5:302021-07-04T18:37:10+5:30
Suicide Case : मावस बहिणींची आत्महत्या : फूस लावून पळविल्याचा आराेप

दाेघा मावस बहिणींना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाला पाेलीस काेठडी
लातूर : शहरालगत असलेल्या हरंगुळ येथील गाेविंद नगरात एकाच साडीने गळफास घेत दाेघा मावस बहिणींनी आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली हाेती. याबाबत एकाविराेधात एमआयडीसी पाेलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तयास अटक करण्यात आली आहे. लातूरच्यान्यायालयात त त्याला हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली.
पाेलिसांनी सांगितले, हंरगुळ (बु.) येथील गाेविंद नगरातील विश्वकर्मा मंदिराशेजारी मुलींचे कुटुंबीय वास्तव्याला आहेत. गितांजली आणि धनश्री या मावस बहिणी आठ दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता हाेत्या. त्यांना पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले हाेते. जबाबही नाेंदविण्यात आला हाेता. मात्र, शनिवारी दाेघा मावस बहिणींनी वरच्या मजल्यावर धुणे धुण्याचा बहाणा केला. दरम्यान, काही वेळानंतर मुली का खाली येत नाहीत? म्हणून घरांच्यांनी वरच्या मजल्यावर येवून पाहिले असता, आतून दार बंद हाेते. दाराला थाप मारली, मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने कुटुंबीयांनी दार ताेडून आत प्रवेश केला. तर पत्र्याच्या आडूला एकाच साडीला दाेघींनी गळफास घेतल्याचे आढळून आले.
याबाबत गितांजलीच्या वडिलांनी एमआयडीसी पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पंकज सुतार याच्याविराेधात फूस लावून पळवून नेने, जीवे मारण्याची धमकी देणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली आहे. अशी माहिती उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांनी दिली.
धमकी दिल्याने मुलींनी केली आत्महत्या...
आठ दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता अलेल्या दाेघा मावस बहिणींना याच परिसरात वास्तव्याला असलेल्या पंकज सुतार याने फुस लावून पळवून नेले हाेते. याबाबत काेणाला काही सांगितले तर जीवे मारु, अशी धमकीही दिली हाेती. दरम्यान, पुण्यातून ताब्यात घेत पाेलिसांनी कुटुंबीयांच्या हवाली केलेल्या मुलींनी घाबरुन आत्महत्या केली असा, गितांजलीच्या वडिलांनी एमआयडीसी पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला आहे.