शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

अडीज कोटींचे दोन मांडूळ सापांची कुरमुऱ्यांमधून लपून तस्करी   

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 8:36 PM

या मांडूळ सापांची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे अडिज कोटी रुपये असल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक शांताराम वळवी यांनी दिली.

ठळक मुद्दे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मदत घेण्यात आली.फाटकाजवळ दुपारी साडे तीनच्या सुमारास एक इसम मोठी निळ्या रंगाची बॅग घेऊन आला. बॅग उघडली असता आत कुरमुरे होते आणि  त्याखाली मांडूळ जातीचे साप लपवून ठेवले होते.

मीरा रोड - सरंक्षित वन्यजीव असणाऱ्या मांडूळ जातीच्या दोन सापांची विक्री करण्यासाठी भाईंदर पूर्वेला फाटक येथे आलेल्या दोघांना नवघर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखने संयुक्त कारवाई करुन अटक केली आहे. या मांडूळ सापांची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे अडिज कोटी रुपये असल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक शांताराम वळवी यांनी दिली.नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंग यांना फाटक जवळ मांडूळ जातीच्या दुर्मिळ सापांच्या विक्रीसाठी काही तस्कर येणार असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड, अपर अधिक्षक संजयकुमार पाटील व उपअधिक्षक शांताराम वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने सापळा रचण्याचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मदत घेण्यात आली.फाटकाजवळ दुपारी साडे तीनच्या सुमारास एक इसम मोठी निळ्या रंगाची बॅग घेऊन आला. त्याच्या जवळ आणखी एक इसम येताच सापळा रचुन असलेले सहाय्यक निरीक्षक प्रमोद बडाख व टिकाराम थाटकर सह उप निरीक्षक विजय टक्के, संजय पाटील, प्रशांत वाघ, संदीप भालेराव, निलेश शिंदे, संदिप शिमदे, प्रदिप टक्के, महेश वेल्हे व महिला पोलीस सुतार यांनी दोघांना ताब्यात घेतले. बॅग उघडली असता आत कुरमुरे होते आणि  त्याखाली मांडूळ जातीचे साप लपवून ठेवले होते.

मांडुळ ताब्यात घेत पोलीसांनी वाजीद हुसेन मोहम्मद युसूफ कुरेशी (४७) रा. कासिम नगर, न्यु लिंक रोड, अंधेरी व शंभु अच्छेलाल पासवान (३९) रा. गेट क्र. ८, मालवणी , मालाड या दोघांना अटक केली. वाजीद हा खाटीक असून पासवानला सोबत बॅग सांभाळण्यासाठी हमाल म्हणून आणले होते. वन्यजीव अधिनियम अन्वये दोघां विरोधात गुन्हा दाखल करुन पोलीसांनी मांडूळ हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन अधिकऱ्यांकडे सुपूर्द केले आहेत.आरोपींनी मांडूळ कोणाला विक्रीसाठी आणले होते, तसेच यापूर्वी सुद्धा अशी विक्री केली होती का ? याचा तपास सुरु असल्याचे उपअधिक्षक वळवी म्हणाले. या दोन मांडूळांची किंमत अडिज कोटी रुपये इतकी असुन काळी जादू वा औषध म्हणून याचा वापर केला जात असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSmugglingतस्करीPoliceपोलिसArrestअटकsnakeसाप