शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणात आरोपी असलेल्या दोघांना जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 06:51 IST

सागर गोरखे आणि रमेश गायकवाड अशी दोन कार्यकर्त्यांची नावे आहेत

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणात आरोपी असलेल्या सागर गोरखे आणि रमेश गायकवाड या कार्यकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी समतेच्या आधारावर जामीन मंजूर केला. या प्रकरणातील इतर आरोपींनाही यापूर्वी अशाच प्रकारचा दिलासा देण्यात आल्याची नोंद न्यायालयाने घेतली.

गोरखे आणि गायकवाड यांना सप्टेंबर २०२० मध्ये अटक करण्यात आली.  सध्या ते तळोजा कारागृहात आहेत. बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

न्या. ए. एस. गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नमूद केले की, या प्रकरणातील अनेक आरोपींना दीर्घकाळ कारावास भोगला आहे. नजीकच्या काळात खटल्याची सुनावणी सुरू होण्याची शक्यता कमी असल्याने जामीन मंजूर करण्यात आला आहे. म्हणूनच समतेच्या आधारावर त्यांना जामिनावर सुटका करणे योग्य आहे. दोघांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा बॉण्ड सादर करण्याचे तसेच महिन्यातून एकदा राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कार्यालयात हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या प्रकरणातील आरोपींपैकी सुरेंद्र गड यांना वगळून सर्वांनाच जामीन मंजूर करण्यात आला आहे. आदिवासी हक्क कार्यकर्ते आणि ८४ वर्षीय धर्मगुरु फादर स्टॅन स्वामी यांचा जुलै २०२१ मध्ये खटला प्रलंबित असतानाच कोठडीत मृत्यू झाला होता. या प्रकरणातील इतर आरोपींमध्ये वरवरा राव, सुधा भारद्वाज, आनंद तेलतुंबडे, व्हर्नन गोन्साल्वेस, अरुण फेरेरा, शोमा सेन, गौतम नवलखा, सुधीर ढवळे, रोना विल्सन, ज्योती जगताप आणि महेश राऊत यांचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Elgar Parishad-Maoist link case: Two accused granted bail by High Court.

Web Summary : Bombay High Court granted bail to Sagar Gorkhe and Ramesh Gaikwad, accused in the Elgar Parishad-Maoist link case, citing parity. The activists, jailed since September 2020, are accused of CPI (Maoist) links. A bond of ₹1 lakh each and monthly NIA visits were mandated.
टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट