ज्वेलरी शॉपमध्ये घुसण्यासाठी बनवलेला भुयार भलतीकडे निघाला आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 13:01 IST2023-03-03T12:58:00+5:302023-03-03T13:01:24+5:30
Crime News : घटनेची सूचना मिळताच व्यापारी नेते जमा झाले आणि पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत आंदोलनावर बसले. पोलिसांनी सांगितलं की, लवकरच चोरांना पकडलं जाईल.

ज्वेलरी शॉपमध्ये घुसण्यासाठी बनवलेला भुयार भलतीकडे निघाला आणि...
Crime News : उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये ज्वेलरी शॉपमध्ये घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण झालं असं की, भुयार चुकून दुसऱ्या दुकानात निघाला. हैराण करणारी बाब ही की, याआधीही चोर या ज्वेलरी शॉपमध्ये भुयार करून शिकले होते आणि चोरी केली होती. मेरठच्या ज्वेलरी शॉपमध्ये भुयार करून घुसण्याची ही तिसरी घटना आहे.
घटनेची सूचना मिळताच व्यापारी नेते जमा झाले आणि पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत आंदोलनावर बसले. पोलिसांनी सांगितलं की, लवकरच चोरांना पकडलं जाईल.
गढ रोडवरील ही घटना आहे. येथील प्रिया ज्वेलरी नावाचं एक दुकान आहे. या दुकानात चोरांनी भुयार करून घुसण्याचा प्रयत्न केला. चोरांनी भुयार खोदला. पण हा भुयार ज्वेलरी शॉपऐवजी बाजूच्या दुकानात निघाला.
असं सांगण्यात आलं की, ज्या दुकानात भुयार निघाला ते दुकान एका घरात होतं. रात्री काहीतरी आवाज आल्याने घरातील लोक उठले. तेव्हा त्यांना भुयार दिसला. जी बघून ते हैराण झाले. ज्या दुकानात भुयाराचा मार्ग निघाला तिथे काहीच नव्हतं.
त्याआधीही 25 ऑगस्ट 2022 मध्ये याच प्रिया ज्वेलर्समध्ये चोरी करण्यासाठी भुयार खोदला होता आणि लाखो रूपयांचं साहित्य चोरी केलं होतं. त्यावेळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. त्यावेळी चोर नाल्यातून भुयार बनवून दुकानात शिरले होते.