शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून विवाहितेला जबरदस्ती पळविण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 16:59 IST

गुन्हा दाखल : घरात घुसून केली अंगलट

ठळक मुद्देपीडित महिला पती व तीन मुलासह एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्याला आहे.आपण दोघं पळून जावू’ असे पीडिताला सांगायला लागला. पीडितेने मी तुझ्या समाजाची नाही, त्याशिवाय माझे लग्न झालेले आहे असे सांगून तु इथून निघून जा म्हणून त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला.

जळगाव : एकतर्फी प्रेमातून २८ वर्षीय विवाहितेला घरातून पळून जाण्यासाठी जबरदस्ती व घरात घुसून अंगलट करणाऱ्या खुशाल मराठे (रा.रामेश्वर कॉलनी) या तरुणाविरुध्द एमआयडीसी पोलिसातविनयभंग व अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. संशयित हा मोबाईल दुरुस्तीचे काम करतो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पती व तीन मुलासह एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्याला आहे. पीडितेचा पती बांधकामावर मजुरीने कामाला जातो. पीडित व खुशाल मराठे याची मोबाईल दुरुस्तीच्या निमित्ताने सहा महिन्यापूर्वी ओळख झाली आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजता पीडिता मुलीसह घरात असताना तेथे खुशाल मराठे आला. ‘मला तु खूप आवडेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे. आपण दोघं पळून जावू’ असे पीडिताला सांगायला लागला. पीडितेने मी तुझ्या समाजाची नाही, त्याशिवाय माझे लग्न झालेले आहे असे सांगून तु इथून निघून जा म्हणून त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने जबरदस्तीने अंगलटपणा करुन ‘माझे तुझ्यावर प्रेमआपण पळून जावू, लग्न करु असे’ पुन्हा सांगू लागला. त्यावर पीडितेने त्याला धक्का मारुन लांब केल्यावर खुशाल याने तु माझ्यासोबत आली नाही तर तुला जीवंत मारुन टाकेन अशी धमकी दिली.त्यामुळे पीडितेने त्याला धक्का मारुन घरातून पलायन केले. दरम्यान, हा प्रकार झाला तेव्हा घर मालक व मालकीन हे देखील उपस्थित होते. पती कामावरुन आल्यानंतर त्यांना झाल्याप्रकाराची माहिती दिली. त्यानुसार रात्री एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्यापुढे घटनाक्रम कथन केला. सहायक पोलीस निरीक्षक सुनंदा पाटील यांनी पीडित महिलेची फिर्याद घेऊन विनयभंग व अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनीही पीडितेकडून माहिती जाणून घेतली.

आईच्या विवाहबाह्य संबंधात अडसर ठरला मुलगा म्हणून प्रियकराला सांगून काढला काटा

 

लॉकडाऊनमधील पहिलाच निकाल : साक्षीदार फितूर तरीही, बालिकेचा खून करणाऱ्यास जन्मठेप

रिक्षातून दवाखान्यात पाठलाग१ जून रोजी सायंकाळी सहा वाजता पोटात त्रास होत असल्याने विवाहिता गल्लीतील मैत्रीणीला घेऊन रिक्षाने रिंगरोडवरील दवाखान्यात जायला निघाली असता खुशाल याने तेव्हा देखील दुचाकीने रिक्षाचा पाठलाग करुन रिक्षा अडवली व त्या रिक्षात बसून दवाखान्यात आला. तेथे त्याने डॉक्टरांशी वाद घातला. तेथून घरी परत येत असताना देखील खुशाल याने विवाहितेचा पाठलाग केला. या दिवशी त्याच्या दहशतीमुळे तक्रार दिली नाही. दुसऱ्या दिवशी देखील असाच प्रकार झाल्याने विवाहितेने पोलिसात तक्रार दिली. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगावPoliceपोलिसArrestअटकMolestationविनयभंगAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा