एटीएम मशिनमधून चोरी करण्याचा प्रयत्न करणारा पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 16:39 IST2019-07-11T16:35:25+5:302019-07-11T16:39:37+5:30
शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशिनमधून पैसे काढण्याचा प्रयत्न करणार्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

एटीएम मशिनमधून चोरी करण्याचा प्रयत्न करणारा पोलिसांच्या ताब्यात
लोणावळा :शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशिनमधून पैसे काढण्याचा प्रयत्न करणार्याला लोणावळा शहर पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
सागर पिंटू उठवाल (वय 24, रा. लोणावळा) असे या इसमाचे नाव आहे. गुरुवारी पहाटे 3.50 वाजण्याच्या सुमारास सागर हा एटीएममध्ये घुसला व मशीन तोडण्याचा प्रयत्न करत असताना रात्रगस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड यांच्या पथकाने त्याला एटीएम सेंटरमधून ताब्यात घेत अटक केली. चोरी होण्यापुर्वीच चोरटा ताब्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड तपास करत आहेत.