आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
By नितीन पंडित | Updated: May 8, 2024 22:36 IST2024-05-08T22:34:35+5:302024-05-08T22:36:16+5:30
अजित पवार गटाचे शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांचा खाजगी स्वीय सहाय्यक प्रशांत सुरेश भोईर याचा रविवारी झाला अपघाती मृत्यू

आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : अजित पवार गटाचे शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या खाजगी स्वीय साहाय्यक प्रशांत सुरेश भोईर वय ३० रा.वाशिंद यांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावरील रांजणोली गावाच्या हद्दीत रविवारी रात्री घडली होती.
याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात सुरुवातीला अज्ञात वाहन चालकावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.सुरुवातीला या घटनेबाबत संशय व्यक्त करण्यात येत होता,मात्र कोनगाव पोलिसांनी केलेल्या तपासात व सीसीटीव्ही फुटेजमध्ये मयत प्रशांत यांस आयवा डंपरने धडक दिल्याचे तपासात समोर आले असून डंपरचालक जनार्धन शिरसाट वय ४० वर्ष रा.मुंब्रा यास कोनगाव पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेऊन गुन्हा जामीनपात्र असल्याने नोटीस बजावून सोडून दिले असल्याची माहिती तपास अधिकारी साहाय्यक पोलीस निरीक्षक एस सी दोडके यांनी दिली आहे.