इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्रक उलटून अपघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 21:18 IST2018-07-27T21:18:22+5:302018-07-27T21:18:53+5:30

ओव्हरलोड माल त्यात भरल्याने तो कलंडला

Truck accident on Eastern Express Highway after collided | इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्रक उलटून अपघात 

इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्रक उलटून अपघात 

मुंबई - इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर आज सकाळी मालवाहू ट्रक उलटून झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला आहे. विक्रोळी येथील गोदरेज कंपनीच्या गेटजवळ साडे दहाच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अपघातग्रस्त ट्रक भिवंडीला जात होता.ओव्हरलोड माल त्यात भरल्याने तो कलंडला. त्यात चालक किरकोळ जखमी झाला आहे. मात्र, ट्रक रस्त्याच्यामध्ये आडवा असल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी ट्रक हटवून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा केला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.   

Web Title: Truck accident on Eastern Express Highway after collided