शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
4
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
5
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
8
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
9
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
10
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
12
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
13
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
14
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
15
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
16
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
17
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
18
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
19
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ

निकाहच्या 2 तासानंतरच दिला तिहेरी 'तलाक', पत्नीला मंडपात सोडून वरात माघारी परतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 15:46 IST

मुलाने लग्नानंतर हुंड्यात कारची मागणी केली. मुलीच्या भावाची पोलिसांत तक्रार.

Agra News: उत्तर प्रदेशातील आग्रा येथून हुंड्याच्या लालसेपोटी लग्नाच्या 2 तासानंतर मुलीला तलाक दिल्याची घटना घडली आहे. हुंड्यात कार न मिळाल्याने मुलाने लग्नानंतर लगेच नववधूला तिहेरी तलाक दिला. वधूला लग्नमंडपात सोडून वरात परत निघाली. या प्रकरणी वधूच्या भावाने ताजगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पती आसिफ, सासू मुन्नी, सासरा परवेज, दीर सलमान, रुखसार, नजराना आणि फरीन यांची नावे आहेत.

ढोलीखार मंटोला या शहरात राहणाऱ्या मुस्लिम कुटुंबातील दोन सख्या बहिणींचे लग्न अमन आणि आसिफ यांच्याशी ठरले होते. ठरल्याप्रणाणे गेल्या बुधवारी फतेहाबाद रोडवर असलेल्या प्रियांशू गार्डनमध्ये निकाह पार पडला. अमनने थोरल्या बहिणीला पत्नी म्हणून स्वीकारले प्रथेनुसार बुधवारी तिची पाठवणी झाली. गुरुवारी पहाटे धाकटी मुलगी डॉलीची पाठवणी होती, पण आसिफ आणि त्याच्या कुटुंबीयांनी हुंडा म्हणून कारची मागणी करण्यास सुरुवात केली. 

अचानक आलेल्या या मागणीमुळे वधूचे कुटुंबीय घाबरले. वऱ्हाडीला समजावून सांगण्यासाठी लाखो विनंत्या केल्या, पण हुंडा हव्यासापोटी वराने कोणाचेही ऐकले नाही आणि नववधूला तीन वेळा तलाक देऊन लग्न घरातून निघून गेले. मुलाच्या कृत्यानंतर वधूच्या कुटुंबात खळबळ उडाली. घरातील सदस्य खूप अस्वस्थ आहेत. पोलिसांनी सांगितले की, तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पाहणी सुरू आहे.

तिहेरी तलाक असंवैधानिक 22 ऑगस्ट 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने आपल्या निर्णयात तिहेरी तलाक असंवैधानिक घोषित केला होता. सर्वोच्च न्यायालयाने 1400 वर्षे जुनी प्रथा असंवैधानिक असल्याचे म्हटले आणि सरकारला कायदा करण्यास सांगितले. न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने कायदा करून तीन तलाक म्हणणे किंवा लिहून लग्न मोडणे गुन्हाच्या श्रेणीत आणले. या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त तीन वर्षांच्या कारावासाचीही तरतूद आहे. 

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारMuslimमुस्लीमmarriageलग्नagra-pcआग्राCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस