विवाहितेनं घेतला थरकाप उडवणारा बदला! स्वतःसह कुटुंबातील 4 जणांना जिवंत जाळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 14:16 IST2022-05-14T14:13:56+5:302022-05-14T14:16:14+5:30

संबंधित महिलेने शनिवारी सकाळी स्वतःसह कुटुंबातील चार जणांवर पेट्रोल ओतून पेटवून घेतले.

Trembling revenge taken by a married woman! 4 members of the family including himself were burnt alive | विवाहितेनं घेतला थरकाप उडवणारा बदला! स्वतःसह कुटुंबातील 4 जणांना जिवंत जाळलं

विवाहितेनं घेतला थरकाप उडवणारा बदला! स्वतःसह कुटुंबातील 4 जणांना जिवंत जाळलं

बिहारमध्ये पतीच्या दुसऱ्या लग्नामुळे संतप्त महिलेने, असे टोकाचे पाऊल उचलले, की संपूर्ण कुटुंबच उद्धवस्त झाले. या घटनेत दोन जणांचा जळून मृत्यू झाला आहे. येथे त्यांच्यासाठी रडायलाही कुणी नाही. तर कुटुंबातील दोन जण गंभीररित्या भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना सुपौल बाजारमधील शेखपूरा भागात घडली.

संबंधित महिलेने शनिवारी सकाळी स्वतःसह कुटुंबातील चार जणांवर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. या घटनेत भाजल्याने ही महिला आणि तिच्या सासूचा मृत्यू झाला आहे. तर तिचा पती आणि सवत गंभीर रित्या भाजले आहेत. या दोघांनाही सर्वप्रथम स्थानिक सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथून त्यांना डीएमसीएचमध्ये रेफर करण्यात आले आहे. या दोघांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. 

मृतांमध्ये बीबी परवीन (35) आणि तिची सासू रुफैदा खातून यांचा समावेश आहे. शेखपुरा मोहल्ला येथील रहिवासी प्लंबर मिस्त्री खुर्शीद आलम याचा गेल्या 10 वर्षांपूर्वी गावातीलच बीबी परवीन हिच्याशी विवाह झाला होता. पण मुले होत नसल्यामुळे खुर्शीदने दोन वर्षांपूर्वी, शेजारच्या गावातील रोशनी खातूनसोबत दुसरे लग्न केले. बीबी परवीनचा या लग्नाला पहिल्यापासूनच विरोध होता. एवढेच नाही, तर याचे भयंकर परिणाम होतील, असा इशाराही ती खुर्शीदला देत होती. महत्वाचे म्हणजे, या विषयावर या दोघांमध्ये यापूर्वीही अनेक वेळा वाद झाले होते, असेही समजते.

अखेर, बीबी परवीनने शनिवारी सकाळच्या सुमारास, हे टोकाचे पाऊल उचलले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली. या घटनेमुळे परिसरातील लोक प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. सर्वत्र, याच घटनेची चर्चा होताना दिसत आहे. कुटुंबातील दोन सदस्यांच्या मृत्यूवर रडण्यासाठीही येथे कुणी नाही.
 

Web Title: Trembling revenge taken by a married woman! 4 members of the family including himself were burnt alive