माझ्यावर झालेला ट्रॅप हा धादांत फॅब्रिकेटेड आहे, म्हणून मला कोर्टाने त्वरित सोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 09:18 PM2021-10-12T21:18:27+5:302021-10-12T21:19:03+5:30

The ACP trap on me is completely fabricated : न्यायालयाला खात्री पटल्यानंतर ACP सुजाता पाटील यांना जामीन मिळाला.

The trap on me is completely fabricated, so the court released me immediately. | माझ्यावर झालेला ट्रॅप हा धादांत फॅब्रिकेटेड आहे, म्हणून मला कोर्टाने त्वरित सोडले

माझ्यावर झालेला ट्रॅप हा धादांत फॅब्रिकेटेड आहे, म्हणून मला कोर्टाने त्वरित सोडले

googlenewsNext
ठळक मुद्देजामिनावर सुटल्यानंतर सुजाता पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट करून संताप व्यक्त केला आहे

लाचखोरी प्रकरणी एसीबीने अटक केलेल्या एसीपी सुजाता पाटील यांची विशेष न्यायालयाने जामिनावर सुटका केली. वकील नितीन सातपुते यांनी सुजाता पाटील यांची बाजू मांडत जोरदार युक्तिवाद केला. न्यायालयाला खात्री पटल्यानंतर ACP सुजाता पाटील यांना जामीन मिळाला.

 

जामिनावर सुटल्यानंतर सुजाता पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट करून संताप व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सत्याची बाजू घेऊन लढत आहे असा बनाव करणाऱ्या मीडियावाल्यांनो, माझ्यावर झालेला  ट्रॅप  हा धादांत फॅब्रिकेटेड आहे. हे ऐकून कोर्टाने मला त्वरित सोडलेले आहे. ते पण बेंबीच्या डेटाला ताण पडेपर्यंत सांगा. अशा संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. 


सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना त्यांच्या वरिष्ठांच्या आदेशावरून तक्रारदारांनी पूर्वनियोजन करून खोट्या गुन्ह्यात फसवले. बनावट पंचनामा संशयास्पद आहे, पाटील यांच्या हातात कोणतीही रक्कम मिळाली नाही, तक्रारदाराने अँटीचेंबरच्या बंद दरवाज्यातील पलंगावरील रोख रक्कम फेकून दिली आणि एसीपी पाटील त्यावेळी बाथरूममध्ये असताना तक्रारदार पळून गेला. तक्रारदारांनी पॅकेट फेकून पळ काढला आहे याची पाटील यांना कल्पनाही नव्हती. पाटील यांच्या ३४ वर्षांची स्वच्छ आणि पारदर्शक सेवेच्या नोंदी आहेत. त्यांच्या कार्यकाळात बरेच सामाजिक कार्य केले असून गरजू आणि गरीब लोकांना मदत केली असल्याचे वकील नितीन सातपुते यांनी म्हटले आहे. 

मेघवाडी विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुजाता पाटील यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. एसीबीने कार्यालयात सापळा रचून सुजाता पाटील यांना अटक केली होती. तक्रारदाराकडे १ लाखाची त्यांनी मागणी केली होती. ४० हजारांची लाच स्वीकारताना सुजाता पाटील यांना एसीबीच्या पथकाने अटक केली होती. मात्र, हे सर्व आरोप पाटील यांनी फेटाळून लावले आहेत. 

 

 

Web Title: The trap on me is completely fabricated, so the court released me immediately.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.