शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

अंबाजोगाईत वाहतूक शाखेची दमदार कामगिरी; आठवडाभरात २२० वाहनांकडून ७० हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 6:51 PM

आठवडाभरापासून शहर वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत २२० वाहनांवर दंडात्मक कारवाई करून तब्बल ७० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. 

अंबाजोगाई (बीड) : शहरात बेफाम ऑटोरिक्षा आणि सुसाट दुचाकींमुळे अपघात वाढले होते. तसेच वाहनचोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली होती. यामुळे आठवडाभरापासून शहर वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत २२० वाहनांवर दंडात्मक कारवाई करून तब्बल ७० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. 

काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास शिकवणी आटोपून घराकडे निघालेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती. यानंतर पोलिसांनी रोडरोमिओ, सुसाट दुचाकीस्वार आणि बेफाम रिक्षा चालकांविरोधात मोहीम हाती घेतली. शहर वाहतूक पोलिसांनी यात पुढाकार घेऊन सर्व वाहनांची कागदपत्रे तपासण्यास आणि नियमबाह्य पद्धतीने वाहन चालाविणारांवर कारवाईस सुरुवात केली. मागील आठवडाभरापासून दिवसरात्र हि  मोहीम सुरु आहे. यात शाळा, महाविद्यालये आणि खाजगी क्लासेस परिसरावर विशेष लक्ष ठेवण्यात आले.

मागील आठवडाभरात पोलिसांनी शेकडो वाहनांची कागदपत्रे तपासली. ज्या वाहनांची कागदपत्रे अपूर्ण आहेत अश्या १०५ ऑटोरिक्षा आणि २१५ दुचाकीस्वारांवर कारवाई करून ५६ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर, कागदपत्रेच नसलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच, रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे लावलेल्या हातगाड्यांवरही कारवाई करण्यात आली. ११ हातगाड्यांवर खटला भरून १३ हजार २०० रुपये दंड ठोठावण्यात आला. या कारवाईतून चार चाकी वाहनधारकही सुटले नसून रहदारीस अडथळा होईल अश्या पद्धतीने वाहने उभे करणाऱ्या चार वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

हि कारवाई अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक सोमनाथ गिते यांच्या नेतृत्वात फौजदार आडके, वाहतूक शाखेचे सहा. फौजदार बिडगर, साठे, पो.ना. घोळवे, पुरी, सोपने आदींनी पार पाडली. वाहतूक पोलिसांच्या या दमदार कामगिरीचे नागरीकातून स्वागत करण्यात येत आहे.  सर्व कागदपत्रे सोबत ठेवावी “वाहनधारकांनी वाहनाची सर्व कागदपत्रे आणि लायसन्स सोबत ठेवावे. ट्रिपल सीट वाहन चालवू नये. रिक्षाचालकानी गणवेश घालणे आवश्यक आहे. दोषींवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल.”- सोमनाथ गिते, पोलीस निरीक्षक, अंबाजोगाई शहर

टॅग्स :AmbajogaiअंबाजोगाईBeed policeबीड पोलीसtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलर