Police Officers Transfers: राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तपदी अंकुश शिंदे, कृष्ण प्रकाश यांची बदली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 21:43 IST2022-04-20T21:20:35+5:302022-04-20T21:43:24+5:30
आयर्नमॅन असलेले पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली झाली.

Police Officers Transfers: राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तपदी अंकुश शिंदे, कृष्ण प्रकाश यांची बदली
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : आयर्नमॅन असलेले पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली झाली. मुंबई येथील सुधार सेवाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अंकुश शिंदे यांची नवे पोलीस आयुक्त म्हणून वर्णी लागली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाकडून बुधवारी (दि. २०) रात्री याबाबतचे आदेश काढण्यात आले. राज्यभरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
कृष्ण प्रकाश यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, व्हीआयपी सुरक्षा, मुंबई येथे बदली झाली आहे. त्यांनी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून ५ सप्टेंबर २०२० रोजी पदभार स्वीकारला होता. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून पावणे दोन वर्षात त्यांनी धडाकेबाज कामगिरी केली. अवैध धंद्याना चाप लावत जुगार, मटका बंद केला. त्यामुळे अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले होते. तसेच बॅंकांच्या घोटाळेबाजांच्या मुसक्या आवळल्याने व्हाईट काॅलर गुन्हेगारांनीही त्यांचा धसका घेतला होता.
संदीप कर्णिक पुण्याचे नवे सह पोलीस आयुक्तपदी आले आहेत. मुंबई गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याजागी सुहास वारके आले आहेत. उस्मानाबादच्या जिल्हा पोलीस अधीक्षक नीवा जेन यांच्या जागी अक्षय शिंदे यांची बदली झाली आहे.
सुरेश कुमार मेकला - विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे.
रविंद्र शिसवे - विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई.
विरेंद्र मिश्रा - अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई.
सत्य नारायण - विशेष पोलीस महानिरीक्षक, सागरी सुरक्षा,
प्रविणकुमार पडवळ - सह पोलीस आयुक्त आर्थिक गुन्हे, बृहन्मुंबई
एस. जयकुमार - विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन), पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, कार्यालय, मुंबई.
निशिथ मिश्रा - विशेष पोलीस महानिरीक्षक दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई. मोटार परिवहन विभाग, (४)
सुनिल फुलारी - विशेष पोलीस महानिरीक्षक, मोटार परिवाहन विभाग, पुणे
संजय मोहिते - विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई [पद उन्नत करुन]
सुनिल कोल्हे - सह आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई [पद उन्नत करून]
दत्तात्रय कराळे - सह पोलीस आयुक्त, ठाणे शहर
प्रविण आर. पवार - संचालक, महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी, पुणे.
बी. जी. शेखर - विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक [पद उन्नत करुन ]
संजय बाविस्कर - विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे.
जयंत नाईकनवरे - पोलीस आयुक्त, नाशिक शहर.