दुःखद घटना! वाहनाच्या धडकेने मामा- भाचा जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 09:22 PM2021-11-07T21:22:52+5:302021-11-07T21:23:27+5:30

Accident Case : आकाश भिवसन मोरे (१८) व अनिल संजय गायकवाड ( १९, रा. भऊर ता. चाळीसगाव) अशी या मृत मामा- भाच्याची नावे आहेत तर  विनोद विक्रम मोरे (१९) हा जखमी झाला आहे. 

Tragic event! Mama-nephew killed on the spot by vehicle collision | दुःखद घटना! वाहनाच्या धडकेने मामा- भाचा जागीच ठार

दुःखद घटना! वाहनाच्या धडकेने मामा- भाचा जागीच ठार

Next

चाळीसगाव जि. जळगाव : समोरुन येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार  मामा- भाचा जागीच ठार तर तिसरा जखमी झाला. ही घटना  एरंडोल -येवला महामार्गावर बहाळनजीक रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. 
आकाश भिवसन मोरे (१८) व अनिल संजय गायकवाड ( १९, रा. भऊर ता. चाळीसगाव) अशी या मृत मामा- भाच्याची नावे आहेत तर  विनोद विक्रम मोरे (१९) हा जखमी झाला आहे. 


वरील तीनही जण भऊर येथून कामानिमित्त चाळीसगावला येथे गेले होते. तिथून परतत असताना बहाळ गावानजीक समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. यात आकाश व अनिल हे दोन जागीच ठार झाले तर विनोद हा जखमी झाला.

Web Title: Tragic event! Mama-nephew killed on the spot by vehicle collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.