दुःखद घटना! वाहनाच्या धडकेने मामा- भाचा जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 21:23 IST2021-11-07T21:22:52+5:302021-11-07T21:23:27+5:30
Accident Case : आकाश भिवसन मोरे (१८) व अनिल संजय गायकवाड ( १९, रा. भऊर ता. चाळीसगाव) अशी या मृत मामा- भाच्याची नावे आहेत तर विनोद विक्रम मोरे (१९) हा जखमी झाला आहे.

दुःखद घटना! वाहनाच्या धडकेने मामा- भाचा जागीच ठार
चाळीसगाव जि. जळगाव : समोरुन येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार मामा- भाचा जागीच ठार तर तिसरा जखमी झाला. ही घटना एरंडोल -येवला महामार्गावर बहाळनजीक रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.
आकाश भिवसन मोरे (१८) व अनिल संजय गायकवाड ( १९, रा. भऊर ता. चाळीसगाव) अशी या मृत मामा- भाच्याची नावे आहेत तर विनोद विक्रम मोरे (१९) हा जखमी झाला आहे.
वरील तीनही जण भऊर येथून कामानिमित्त चाळीसगावला येथे गेले होते. तिथून परतत असताना बहाळ गावानजीक समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. यात आकाश व अनिल हे दोन जागीच ठार झाले तर विनोद हा जखमी झाला.