घरच्यांना तो शेवटचा कॉल अन् सगळंच संपलं! महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचे कालव्यात सापडले मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 18:49 IST2026-03-07T18:43:34+5:302026-03-07T18:49:49+5:30

गुजरातमध्ये महापालिकेच्या दोन महिला कर्मचाऱ्यांनी स्वतःला संपवल्याची घटना समोर आली आहे.

Tragedy in Gandhinagar Two Civic Body Employees End Lives by Jumping into Canal | घरच्यांना तो शेवटचा कॉल अन् सगळंच संपलं! महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचे कालव्यात सापडले मृतदेह

घरच्यांना तो शेवटचा कॉल अन् सगळंच संपलं! महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचे कालव्यात सापडले मृतदेह

Gujarat Crime: गुजरातची राजधानी गांधीनगरमधून एक अत्यंत खळबळजनक आणि दुःखद घटना समोर आली आहे. गांधीनगर महानगरपालिकेत नुकत्याच रुजू झालेल्या दोन तरुण महिला कर्मचाऱ्यांनी नभोई कालव्यात उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी एका तरुणीने आपल्या कुटुंबाला फोन करून माहिती दिली होती, मात्र नातेवाईक पोहोचेपर्यंत सर्व काही संपले होते.

अहमदाबादच्या रहिवासी असलेल्या सेजल पटेल (२६) आणि रिपल रावत (२४) अशी मृत तरुणींची नावे आहेत. या दोन्ही तरुणींची अलीकडेच गांधीनगर महानगरपालिकेत नियुक्ती झाली होती. शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांनी नभोई कालव्यात उडी घेऊन सामूहिक आत्महत्या केली.

कुटुंबाला दिलेला 'तो' कॉल ठरला शेवटचा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी एका तरुणीने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या कुटुंबीयांना फोन केला होता. मी माझ्या मैत्रिणीसोबत आत्महत्या करायला जात आहे, असे तिने घरच्यांना सांगितले. या धक्कादायक फोननंतर कुटुंबीयांनी वारंवार त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघींचेही फोन स्वीच ऑफ येत होते. घाबरलेले नातेवाईक तातडीने घटनास्थळी पोहोचले, पण त्यापूर्वीच दोघींनी कालव्यात उडी मारली होती.

पाच तासांच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह बाहेर

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक आणि अग्निशमन दलाच्या मदतीने कालव्यात शोधमोहीम राबवण्यात आली. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर कालव्यातून दोन्ही तरुणींचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

आत्महत्येचे कारण अद्याप गूढ

या दोन्ही तरुणींनी इतके टोकाचे पाऊल का उचलले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट पोलिसांना मिळालेली नाही. महानगरपालिकेत नुकतीच सरकारी नोकरी मिळालेल्या या दोन तरुण मुलींच्या अशा जाण्याने प्रशासनातही खळबळ उडाली आहे. पोलीस आता त्यांच्या कॉल रेकॉर्ड्सची तपासणी करत असून, कामाच्या ठिकाणी काही तणाव होता का किंवा वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी हे पाऊल उचलले, या दृष्टीने तपास करत आहेत.

Web Title : अंतिम कॉल और त्रासदी: दो पालिका कर्मचारी मृत पाए गए।

Web Summary : गांधीनगर में दो युवा पालिका कर्मचारियों ने नहर में कूदकर आत्महत्या कर ली। एक ने मरने से पहले परिवार को सूचित किया। पुलिस ने तलाशी के बाद शव बरामद किए। आत्महत्या का कारण अज्ञात है, पुलिस जांच कर रही है।

Web Title : Last call home, then tragedy: Two municipal workers found dead.

Web Summary : Two young municipal workers in Gandhinagar tragically ended their lives by jumping into a canal. One informed her family before the act. Police recovered their bodies after a search. The reason for the suicide is currently unknown and under investigation.