वाहतूक पोलिसावर तरुणाकडून कात्रीने वार; वाकड येथील घटना, बदला घेण्यासाठी केले कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 22:59 IST2026-03-25T22:59:49+5:302026-03-25T22:59:49+5:30

जखमी अन्सारी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या काखेजवळ चार टाके तर हाताच्या कोपराजवळ दोन टाके पडले

Traffic policeman attacked with scissors by youth; incident in Wakad, Pune | वाहतूक पोलिसावर तरुणाकडून कात्रीने वार; वाकड येथील घटना, बदला घेण्यासाठी केले कृत्य

वाहतूक पोलिसावर तरुणाकडून कात्रीने वार; वाकड येथील घटना, बदला घेण्यासाठी केले कृत्य

नारायण बडगुजर

पिंपरी : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने वाहतूक पोलिसांनी तरुणाला अडविले. या रागातून तरुणाने वाहतूक पोलिसावर कात्रीने वार केले. मुंबई-बेंगळुरू महामार्गावर ताथवडे येथील भुयारी मार्गाजवळ बुधवारी (दि. २५ मार्च) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ही घटना घडली. 

अब्दुल माेहम्मद अन्सारी (वय ४०) असे जखमी झालेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हर्षद सुपेकर (वय २८, रा. ताथवडे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षद सुपेकर हा गेल्या आठवड्यात दुचाकीवरून ट्रिपलसिट जात होता. त्यावेळी ताथवडे भुयारी मार्गावजळ वाहतूक पोलिसांनी त्याला अडवले. वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नको, अशी समज त्याला दिली. त्याचा राग हर्षद याच्या मनात होता. 

दरम्यान, बुधवारी सायंकाळी वाकड वाहतूक विभागाचे पोलिस अंमलदार अब्दुल अन्सारी हे ताथवडे येथील भुयारी मार्गाजवळ वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी हर्षद सुपेकर तेथे आला. त्याने पाठीमागून अन्सारी यांच्यावर अचानक कात्रीने हल्ला केला. यात अन्सारी यांच्या पाठीमागे डाव्या काखेजवळ आणि डाव्या हाताच्या कोपराजवळ वार करून जखमी केले. त्यानंतर हर्षद तेथून पसार झाला. 

याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अन्सारी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या काखेजवळ चार टाके तर हाताच्या कोपराजवळ दोन टाके पडले. त्यानंतर अन्सारी यांनी वाकड पोलिस ठाण्यात तक्रार केली. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title : ट्रैफिक पुलिस पर युवक ने कैंची से हमला किया, जुर्माना बना वजह।

Web Summary : पिछले ट्रैफिक उल्लंघन से नाराज युवक ने वाकड के पास ट्रैफिक पुलिसकर्मी पर कैंची से हमला किया। अधिकारी को पीठ और हाथ में चोटें आईं और उन्हें अस्पताल में भर्ती कराया गया। पुलिस ने आरोपी के खिलाफ मामला दर्ज किया है।

Web Title : Youth attacks traffic cop with scissors in Wakad over fine.

Web Summary : Upset about a previous traffic stop, a youth attacked a traffic policeman with scissors near Wakad. The officer sustained injuries to his back and arm and was hospitalized. Police have registered a case against the accused.