टेम्पोच्या भाड्यावरुन वाहतूक पोलिसाची दादागिरी, जमावाकडून कपडे फाटेपर्यंत मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 14:54 IST2021-10-11T14:49:48+5:302021-10-11T14:54:23+5:30

UP Aligarh News: वाहतुक पोलिसाने एका व्यक्तीला नाका-तोंडातून रक्त येईपर्यंत मारहाण केली, यानंतर जमाव संतप्त झाला.

Traffic police beaten up by locals in Aligarh UP | टेम्पोच्या भाड्यावरुन वाहतूक पोलिसाची दादागिरी, जमावाकडून कपडे फाटेपर्यंत मारहाण

टेम्पोच्या भाड्यावरुन वाहतूक पोलिसाची दादागिरी, जमावाकडून कपडे फाटेपर्यंत मारहाण

अलीगड: अलीगडच्या गांधीपार्क भागात रविवारी रात्री एका वाहतूक पोलिसाला जमावाकडून बेदम मारहाण झालीये. टेम्पोच्या भाड्यावरून पोलीस कर्मचारी आणि टेम्पो चालकात वाद झाला. या दरम्यान पोलीस कर्मचाऱ्याने टेम्पोतील एका प्रवाशाला मारहाण करत जखमी केलं. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी पोलिसाला चांगलाच चोप दिला. 

मिळालेल्या माहितीनुसार, ससनीगेटकडून येणाऱ्या टेम्पोमध्ये वाहतूक पोलिस कर्मचारी गणवेशातून प्रवास करत होता. तो मदारगेट तिराहेजवळ उतरला, तेव्हा त्याला टेम्पो चालकाने भाडं मागितलं. भाडं मागताच, पोलीस कर्मचारी भडकला आणि त्याने टेम्पो चालकाला शिव्या दिल्या. यावर टेम्पोतील एका प्रवाशाने पोलिसाला हटकलं. पोलिसांच्या गणवेशात असं वागणं शोभत नसल्याची जाणीव या तरुणाने पोलिसाला करुन दिली. 

तरुणाला मारहाण
यावरुन या वाहतूक पोलिसाने तरुणाला शिवीगाळ करुन मारहाण केली. या मारहाणीत तरुणाच्या नाका-तोंडातून रक्त यायला लागलं. ही घटना शहरातील मोठ्या बाजारपेठेत झाल्यामुळे अनेकांनी ही घटना पाहिली आणि त्या तरुणाच्या मदतीला धावले. यावेळी पोलिसांनी नागरिकांनाही शिव्या दिल्या, यावर संतत्प नागरिकांनी पोलिस कर्मचाऱ्याला कपडे फाटेपर्यंत चोप दिला.

Web Title: Traffic police beaten up by locals in Aligarh UP