टीएमटी बसचा झाला किरकोळ अपघात; ३ वाहनांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 18:01 IST2019-04-11T17:59:20+5:302019-04-11T18:01:16+5:30
सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही

टीएमटी बसचा झाला किरकोळ अपघात; ३ वाहनांचे नुकसान
ठळक मुद्देडेपोच्या कंपाउंड भिंतीवर ही बस जोरदार आदळली.बसचालक खानविलकर हे यावेळी बस चालवत होते.
ठाणे - ठाणे वागळे इस्टेट परिसरातील लोकमान्य टिळक बस डेपोत टीएमटीच्या बसचा (एमएच ०४; जी ८११४) अपघात झाला आहे. बसचालक खानविलकर हे यावेळी बस चालवत होते. डेपोच्या कंपाउंड भिंतीवर ही बस जोरदार आदळली. मात्र, सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही अथवा जीवितहानी झालेली नाही. मात्र अपघातात भिंतीचा काही भाग कोसळल्याने होंडा शाईन (एमएच ०४; जेएस ३१९०) होंडा ऍक्टिव्हा (एमएच ०४; एफबी ५९३७) ही दोन दुचाकी वाहने आणि एका ऑटोरिक्षाचे ( एमएच ०४; एचझेड ४४४८) नुकसान झाले आहे.
ठाणे - टीएमटीच्या बसचा अपघात; वाहनांचे नुकसान; जीवितहानी झालेली नाही https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) April 11, 2019