विवाहबाह्य संबंधांना कंटाळून मुलानेच आई अन् तिच्या प्रियकराला संपवले
By पूनम अपराज | Updated: January 10, 2021 21:30 IST2021-01-10T21:29:35+5:302021-01-10T21:30:06+5:30
Double Murder : महिलेसोबत डॉ. शेखावत हा विवाहबाह्य संबंधात राहत होता.

विवाहबाह्य संबंधांना कंटाळून मुलानेच आई अन् तिच्या प्रियकराला संपवले
राजस्थानातील जयपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. २० वर्षीय मुलाने आपल्या आईला आणि तिच्या प्रियकराला कायमचे संपवून टाकले आहे. या घटनेनंतर आरोपी मुलगा फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने आपली आई आणि तिच्या प्रियकराची गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. कौटुंबिक वादानंतर आरोपी मुलगा आणि आईच्या नात्यात कटुता निर्माण झाली. महिलेसोबत डॉ. शेखावत हा विवाहबाह्य संबंधात राहत होता.
ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. ३८ वर्षीय सुमन हिचे काही दिवसांपूर्वी पतीसोबत भांडण झाले. त्यानंतर ती डॉ. शेखावत याच्यासोबत राहत होती. तिचा मुलगा पंकज हा देखील दोघांसोबत राहत होता. शुक्रवारी रात्री पंकजने सुमन आणि डॉ. शेखावत यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपीने त्याची माहिती आपल्या एका नातेवाईकाला दिली आणि पळून गेला. त्यानंतर त्याने आपला फोन बंद ठेवला आणि फरार झाला. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.