पिस्तुल, कोयत्याचा धाक दाखवून तरुणाला लुटले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 17:55 IST2019-04-26T17:53:22+5:302019-04-26T17:55:47+5:30

पूर्वीच्या प्रेयसीने व तिच्या पतीने ५६ हजारांना लुटले.

Throwing a pistol,and weopan robbing of person | पिस्तुल, कोयत्याचा धाक दाखवून तरुणाला लुटले 

पिस्तुल, कोयत्याचा धाक दाखवून तरुणाला लुटले 

पिंपरी : पिस्तुल व कोयत्याचा धाक दाखवून एका तरुणाला त्याच्या पूर्वीच्या प्रेयसीने व तिच्या पतीने ५६ हजारांना लुटले. तसेच ५० लाखांची खंडणीही मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौघांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
ऋषीकेश विद्याधर काळभोर (वय ३०, रा. लोणीकाळभोर, कदमवाकवस्ती, ता. हवेली. जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पूर्वीच्या प्रेयसीसह तिच्या पतीवर व इतर दोन साथीदारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फियार्दी व यातील महिला आरोपी यांचे पुर्वी प्रेमसंबंध होते. त्यानंतर महिलेने दुसरया एका तरुणाशी लग्न केले. दरम्यान, फिर्यादी व संबंधित महिला यांच्यातील पूर्वीच्या संबंधाचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने यातील आरोपींनी फिर्यादी यांना हाताने व बिअरच्या बाटलीने मारहाण केली. त्यानंतर कोयता व पिस्तुलचा धाक दाखवून त्यांच्याकडील ४५ हजार रुपये किंमतीची सोनसाखळी व साडे दहा हजारांची रोकड हिसकावून नेली. तसेच याबाबत कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतरही फिर्यादी यांना प्रत्यक्ष भेटून व फोन करुन खोटी तक्रार देण्याची धमकी देत त्यांच्याकडे ५० लाख रुपयांची मागणी केली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Throwing a pistol,and weopan robbing of person