शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

थरारक! भाऊ बहिणीची हत्या करून डोळे काढले बाहेर अन् कान कापले,काका आहे आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 21:53 IST

Murder Case : मुलांची हत्या केल्यानंतर आरोपीने डोळे का काढले याचाही तपास पोलीस करत आहेत. एसआयटी स्थापन करून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

नवी दिल्ली : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निष्पाप भाऊ-बहिणीच्या हत्येनंतर दोघांचेही डोळे काढण्यात आले. मृत मुलांच्या काकावर खुनाचा आरोप आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. झारखंडमधील पाकूर जिल्ह्यातील ही घटना आहे. मुलांची हत्या केल्यानंतर आरोपीने डोळे का काढले याचाही तपास पोलीस करत आहेत. एसआयटी स्थापन करून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.काय प्रकरण आहे?मुलांचे वडील प्रेम मरांडी सांगतात की, गुरुवारी संध्याकाळी गावातीलच मोहाली टोला येथे म्हशींची झुंज झाली. प्रेम मरांडीही तेथे गेले. यावेळी त्यांचे चुलत भाऊ नेहरू मरांडी हे देखील तिथे उपस्थित होते. प्रेमने सांगितले की, म्हशींची झुंज पाहिल्यानंतर तो काही कामानिमित्त कुठेतरी गेला होता, त्यानंतर त्याचा चुलत भाऊ नेहरू उर्फ ​​तुर्का त्याच्या घरी पोहोचला. नेहरूने प्रेमच्या मुलांना, 10 वर्षांच्या मार्शिला मरांडी आणि तिचा धाकटा भाऊ, 9 वर्षांचा बाबुलाल मरांडी यांना सांगितले त्यांचे वडील दारू पिऊन कुठेतरी पडले होते.तुर्काच्या सांगण्यावरूननुसार, भाऊ आणि बहिण आपल्या काकासह आपल्या वडिलांना शोधण्यासाठी गेले. प्रेम त्याच्या घरी पोहोचल्यावर तुर्का आपल्या घरी येऊन त्याने खोटी बतावणी करून  दोन्ही मुलांना सोबत नेल्याचं समजलं. यानंतर मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. शुक्रवारी सकाळी गावातील शेतात दोन्ही मुलांचे मृतदेह विकृत अवस्थेत आढळून आले.मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत असून तिचा एक डोळा काढण्यात आला असून कान कापण्यात आले आहेत. तसेच मुलाचा एक डोळाही काढण्यात आला असून कानही कापण्यात आले आहेत. मुलांची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. मुलांचे मृतदेह सापडल्यापासून तुर्का हा फरार असून पोलिसांनी त्याचा भाऊ गोमस्त मरांडी, वडील प्रधान मरांडी आणि आई पूर्ती हंसदा यांना अटक केली आहे.आरोपींनी मुलांचे डोळे का काढले आणि कान का कापले याचाही तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी वैद्यकीय पथकाची देखील स्थापना करण्यात आली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूJharkhandझारखंडPoliceपोलिस