थरारक ! तब्बल १६ वेळा कुऱ्हाडीने वार करून मित्रालाच संपविले; औध येथील घटना   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 17:50 IST2020-10-21T17:49:40+5:302020-10-21T17:50:14+5:30

तीन महिन्यांपूर्वी क्षितिज आणि अनिकेतमध्ये भांडण झाले होते...

Thrilling! Murdered by friend with 16 times sword weopan attack ; Incident of Aundh | थरारक ! तब्बल १६ वेळा कुऱ्हाडीने वार करून मित्रालाच संपविले; औध येथील घटना   

थरारक ! तब्बल १६ वेळा कुऱ्हाडीने वार करून मित्रालाच संपविले; औध येथील घटना   

पुणे : पूर्व वैमनस्यातून राग मनात धरून मित्रानेच मित्राची भर चौकात कुऱ्हाडीने तब्बल १६ वेळा वार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही थरारक घटना औंधमधील मलिंग चौकामध्ये सोमवारी (दि. १९ ) घडली. क्षितिज चंद्रकांत वैरागर (वय २१ ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.  
 
अनिकेत दीक्षित (वय 23) असे हत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; तीन महिन्यांपूर्वी क्षितिज आणि अनिकेतमध्ये भांडण झाले होते. त्याचाच राग मनात धरून आरोपी अनिकेतने क्षितिजवर कुऱ्हाडीने वार करत त्याची निर्घृणपणे हत्या केली. 

औंध येथील मलिंग चौकात क्षितिज हा मित्रांसोबत गप्पा मारत होता. त्याचवेळी आरोपी अनिकेत तिथे आला व कुऱ्हाडीने क्षितिजच्या डोक्यावर वार केला. यात क्षितिज जागेवरच कोसळला.त्यानंतर तिथे असलेल्या चार मित्रांनी अनिकेतला धरले. परंतु, अनिकेतने त्यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर सुद्धा कुऱ्हाड उगारली.तसेच क्षितिजवर कुऱ्हाडीने वार करणे सुरूच ठेवले होते. तिथे उपस्थित असणाऱ्या मित्रांनी आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला.पण तो काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी ते मित्रही निघून गेले. त्यानंतर अनिकेतने पुन्हा क्षितिजवर कुऱ्हाडीने तब्बल १६ वेळा वार केले. याच क्षितिजचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाणे गाठत पोलिसांसमोर हजर झाला होता.
 

Web Title: Thrilling! Murdered by friend with 16 times sword weopan attack ; Incident of Aundh