थरारक! कुर्ला रेल्वे स्थानकात धावत्या लोकल ट्रेनसमोर उडी मारून संपवलं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 21:44 IST2021-08-18T21:43:51+5:302021-08-18T21:44:43+5:30
Suicide Case : या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे.

थरारक! कुर्ला रेल्वे स्थानकात धावत्या लोकल ट्रेनसमोर उडी मारून संपवलं आयुष्य
मध्य रेल्वेच्याकुर्लारेल्वे स्थानकात धावत्या लोकल ट्रेनसमोर उडी घेत एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही थरारक घटना रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर ही घटना घडली आहे. सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास भरधाव लोकल ट्रेन येत असल्याचं पाहून एका व्यक्तीने थेट रेल्वे रुळावर उडी मारली. लोकल ट्रेन नजीक येताच या व्यक्तीने थेट रुळावर उडी मारली. रेल्वे प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांना काही कळण्याआधीच ही घटना घडली. या घटनेत संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीने आत्महत्या का केली? तो व्यक्ती कोण आहे? याबाबत पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. मात्र, मृत इसमाच्या हातावर एक टॅटू असून त्यावर संतोष नाव असल्याची माहिती समोर आली आहे. या व्यक्तीची ओळख पटविण्याचं काम सुरू आहे.
पिस्तुलांच्या विक्रीसाठी आलेल्या मध्यप्रदेशच्या दोघांना विक्रोळी येथे अटकhttps://t.co/uMNe4a7xtb
— Lokmat (@MiLOKMAT) August 18, 2021