शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्रात थरार! बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार, पोलिसांच्या चकमकीनंतर सराईत गुन्हेगार जेरबंद; हल्लेखोराकडून दोन पिस्तूलांसह काडतुसे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 15:54 IST

दोन स्थानिक रहिवासी जखमी; हल्लेखोराकडून दोन पिस्तूलसह व जिवंत काडतुसे जप्त

ठाणे/मुंब्रा : मुंब्रा येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि युट्युबर नदीम खान उर्फ बाबा खान यांच्या घरावर आणि वाहनावर  शनिवारी पहाटे ४.५० वाजण्याच्या सुमारास एका टोळीने गोळीबार केला. या घटनेनंतर आरोपीचा थरारक पाठलाग करणाºया पोलीस पथकावरही हल्लेखोराने दोन रिव्हॉल्व्हरमधून  बेछूट गोळीबार केला. मात्र, जीवाची पर्वा न करता मुंब्रा पोलिसांनी सराईत गुन्हेगार शहाबाद उर्फ शंभू मुन्ना शमशाद कुरेशी (२८) याला फिल्मी स्टाईलने अटक केली आहे. या धुमश्चक्रीत दोन स्थानिक नागरिक गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंब्रा भागात पोलिसांची जादा कुमक तैनात केली आहे. 

*पहाटेचा थरार आणि पोलिसांचा पाठलागकौसा येथील अरमान को-आॅपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणारे नदीम यांच्या घराबाहेर शनिवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराचा आवाज झाला. हल्लेखोरांनी खान यांच्या कारवर दोन आणि हवेत एक अशा एकूण तीन गोळ्या झाडल्या. घटनेची माहिती मिळताच बीट मार्शल आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक तेजस सावंत,  सोनवणे यांच्यासह पथक घटनेची माहिती मिळताच अवघ्या पाच ते सात मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल झाले.चौकशीमध्ये हल्लेखोर आचार गल्लीतील एका भंगार गोदामात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला शरण येण्यास सांगितले असता, त्याने दोन्ही हातात पिस्तूल घेऊन पोलिसांच्या दिशेने सिनेस्टाईलने गोळीबार करण्यास सुरुवात केली.*दोघे जखमी, ८ वर्षांचा 'तिहार'चा प्रवास-पोलिसांनी पाठलाग सुरू केल्यावर हल्लेखोराने  जमावाच्या दिशेनेही गोळीबार केला. यामध्ये एका स्थानिकाच्या पोटात, तर दुसºयाच्या  हाताला गोळी लागून ते जखमी झाले. जखमींना तात्काळ एका खासगी  रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक  सावंत, पोलीस हवालदार तडवी आणि अंमलदार महाडीक यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून हल्लेखोराला जमिनीवर पाडले आणि त्याच्याकडील दोन पिस्तूल, चार मॅगझिनसह जिवंत काडतुसे जप्त केली. हल्लेखोर सराईत गुन्हेगार  शहाबाद असल्याची माहिती चौकशीत समोर आली.  त्याने दिल्लीतील तिहार कारागृहात आठ वर्षे शिक्षा भोगली आहे. त्याच्यावर दिल्लीतील जाफ्राबाद पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक  सावंत, सोनावणे व त्यांच्या पथकाने मोलाची कामगिरी बजावली. सध्या मुंब्य्रातील या भागात पोलीस बंदोबस्त तैनात केला असून शहाबादच्या फरार साथीदाराचाही  शोध घेण्यात येत आहे. या गोळीबाराचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Firing in Mumbra: Builder's House Attacked, Criminal Arrested After Chase

Web Summary : Mumbra builder Nadeem Khan's house was shot at. Police chased and arrested criminal Shahabad Qureshi after a shootout where two civilians were injured. Two pistols were seized.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस