शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

पुण्यातील होर्डिंग अपघाताला जबाबदार असणाऱ्या तीन कामगारांना अटक : महिनाभर होते फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 9:06 PM

जुना बाजार येथील शाहीर अमर शेख चौकात ५ आॅक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या रेल्वेच्या हद्दीतील मोठे होर्डिंग पडून त्याखाली सापडल्याने चार जणांचा मृत्यु झाला होता़.

ठळक मुद्देखंडणी विरोधी पथकाची कामगिरी या प्रकरणी निष्काळजीपणा दाखविलेल्याने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

पुणे : होर्डिंग काढताना ते कोसळून झालेल्या अपघात गेले महिन्याभरापासून फरार असलेल्या होर्डिंग कापणाºया तिघांना पकडण्यात खंडणी विरोधी पथकाला यश मिळाले आहे़. रामदास सरोदे (रा़ आष्टी), धनंजय भोळे (रा़ बार्शी) आणि देवदास कोठारी (रा़ लोहार, छत्तीसगड) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत़. याप्रकरणी आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली असून ठेकेदार मल्लिकार्जुन हा अजून फरार आहे़. जुना बाजार येथील शाहीर अमर शेख चौकात ५ आॅक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या रेल्वेच्या हद्दीतील मोठे होर्डिंग पडून त्याखाली सापडल्याने चार जणांचा मृत्यु झाला होता़. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी रेल्वे अभियंता संजयसिंग विष्णुदेव (वय ४२, रा. विकासनगर, देहूरोड) आणि त्याच्या सहकारी पांडुरंग निवृत्ती वनारे ( वय ५७, रा.कसबा पेठ) व त्यानंतर कॅप्शन अडव्हर्टाझिंग कंपनीचा मालक अब्दुल रज्जाक महम्मद खालीद फकिह (वय ५४, रा. अर्जुन मनसुखानी पथ, कोरेगाव रस्ता) यांना अटक केली होती़. या प्रकरणी निष्काळजीपणा दाखविलेल्याने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. या घटनेनंतर होर्डिंग कोसळताना ते कापत असलेले ही तीनही कामगार पळून गेले होते़. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे व त्यांचे सहकारी हडपसर पोलीस ठाण्याच्या परिसरात १२ नोव्हेंबरला गस्त घालत होते़. त्यावेळी पोलीस हवालदार काळभोर यांना या कामगारांविषयी माहिती मिळाली होती़. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांच्या सूचनेनुसार मिळालेल्या माहितीनुसार घुगे व त्यांचे सहकारी हडपसर येथील वैभव टॉकीजसमोर गेले़ तेथे तिघे जण संशयास्पदरित्या थांबलेले दिसून आले़. पोलिसांनी त्यांना घेरून ताब्यात घेतले़. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा कबुल केला़. तिघांना बंडगार्डन पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक