तांगा शर्यतीत दगडफेकीत पोलीस अधिकाऱ्यासह तिघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 20:03 IST2019-01-21T20:01:19+5:302019-01-21T20:03:50+5:30

दापूर येथील तेलमाथ्यावर खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त तांगा शर्यतीचे आयोजन केले असल्याचे समजते.

Three policemen, including a police officer were injured in a tragic race | तांगा शर्यतीत दगडफेकीत पोलीस अधिकाऱ्यासह तिघे जखमी

तांगा शर्यतीत दगडफेकीत पोलीस अधिकाऱ्यासह तिघे जखमी

ठळक मुद्दे सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात असून गुन्हे दाखल करण्याचे काम वावी पोलीस ठाण्यात सुरू झाले आहे.

सिन्नर(नाशिक) - सिन्नर तालुक्यातील दापूर येथे तांगा शर्यत थांबविण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर शौकिनांनी जबर दगडफेक केली. यात वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्यासह तीन जण जखमी झाले. सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. दापूर येथील तेलमाथ्यावर खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त तांगा शर्यतीचे आयोजन केले असल्याचे समजते. घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात असून गुन्हे दाखल करण्याचे काम वावी पोलीस ठाण्यात सुरू झाले आहे.

Web Title: Three policemen, including a police officer were injured in a tragic race