लोणावळा येथील वॅक्स म्युझियम मध्ये चोरी करणारे तीन जण गजाआड 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 02:13 PM2019-04-01T14:13:46+5:302019-04-01T14:18:27+5:30

लोणावळा येथील सुनिल वॅक्स म्युझियममध्ये चोरी करत राजस्थान येथे पोबारा केलेल्या पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

Three people arrested in reason for Wax Museum thief | लोणावळा येथील वॅक्स म्युझियम मध्ये चोरी करणारे तीन जण गजाआड 

लोणावळा येथील वॅक्स म्युझियम मध्ये चोरी करणारे तीन जण गजाआड 

Next
ठळक मुद्देराजस्थानमधून मुद्देमालासह आरोपी घेतले ताब्यात  

लोणावळा : लोणावळा येथील सुनिल वॅक्स म्युझियममध्ये गल्ल्यामधील दोन लाख रुपये रोख, दोन संगणकाचे मॉनिटर व एक एलईडी टिव्ही असा दोन लाख 45 हजारांचा मुद्देमाल चोरुन राजस्थान येथे पोबारा केलेल्या लोणावळा पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. वॅक्स म्युझियमचे व्यवस्थापक अनिलकुमार तामराशन यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
  मोतीराम छत्राराम ओटावत (वय २२), हरिराम मोतीराम चव्हाण (वय २०) व शंकर चौहान (वय २३, सर्व रा.दानवरली गाव, जि. पाली राजस्थान) अशी याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. २७ मार्च रोजी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास आरोपीनी तोंडाला कपडा बांधत बंद दरवाज्याच्या ग्रिलमधून आतमध्ये प्रवेश केला. कॅश काऊंटमधील दोन लाख रुपये रोख, दोन मॉनिटर व एक एलईडी टिव्ही चोरुन थेट राजस्थानला पोबारा केला होता.चोरट्यांपैकी दोन जणांनी वॅक्स म्युझियमच्या कॉपी शॉपमध्ये पूर्वी काम केलेले असल्याने त्यांना याठिकाणची माहिती होती घटनेची माहिती समजताच लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील व स्थानिक गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड, वैभव सुरवसे, सामिल प्रकाश, राम जगताप यांच्या पथकाने सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवत राजस्थान गाठले. त्याठिकाणी तीनही आरोपीना एक लाख ४२ हजार रुपयांची रोकड व एक मॉनिटर याच्यासह ताब्यात घेतले. याप्रकरणी तीनही आरोपीना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड हे करत आहेत. 

Web Title: Three people arrested in reason for Wax Museum thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.