वैनगंगा नदीत तीन मुलींना जलसमाधी, नाव उलटून अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 04:06 PM2021-05-18T16:06:56+5:302021-05-18T16:07:45+5:30

हा अपघात सकाळी घडला. तिघींचेही मृतदेह सापडले आहेत.

Three girls drowned in Wainganga river | वैनगंगा नदीत तीन मुलींना जलसमाधी, नाव उलटून अपघात

वैनगंगा नदीत तीन मुलींना जलसमाधी, नाव उलटून अपघात

Next
ठळक मुद्देमृत मुलींमध्ये सोनी मूकरू शेंडे, समृध्दी ढिवरु शेंडे (रा.वाघोली) या चुलत बहिणी आणि पल्लवी रमेश भोयर (रा.येवली) या त्यांचा आत्येबहिणीचा समावेश आहे.

चामोर्शी (गडचिरोली) : चामोर्शी तालुक्यातील वाघोली या गावातील 3 मुलींचा वैनगंगा नदीत डोंगा (छोटी नाव) उलटून झालेल्या अपघातात पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा अपघात सकाळी घडला. तिघींचेही मृतदेह सापडले आहेत.

मृत मुलींमध्ये सोनी मूकरू शेंडे, समृध्दी ढिवरु शेंडे (रा.वाघोली) या चुलत बहिणी आणि पल्लवी रमेश भोयर (रा.येवली) या त्यांचा आत्येबहिणीचा समावेश आहे. तिघीही 12 ते 14 वर्ष वयोगटातील आहेत. यातील सोनी ही विश्वशांती विद्यालय भेंडाळा येथील  विद्यार्थीनी असून ती यावर्षी आठव्या वर्गात होती.

या तिघी मुली डोंग्याने वैनगंगा नदीच्या पैलतीरावर चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या आमराईत आंबे आणण्यासाठी जात होत्या. पण खोल पाण्यात त्यांचा डोंगा उलटल्याचे सांगितले जाते. या अपघातात नावाडी बचावला पण तीनही मुली पाण्यात बुडाल्या. शोधमोहीमेनंतर तिघींचे मृतदेह सापडले.

Web Title: Three girls drowned in Wainganga river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app