तीन कोटींचे परदेशी चलन जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 22:51 IST2019-04-11T22:50:48+5:302019-04-11T22:51:37+5:30
या प्रकरणी आयकर विभाग तपास करत आहे.

तीन कोटींचे परदेशी चलन जप्त
मुंबई - पोलिसांनी माहीम येथून तीन कोटी रुपये मूल्याचे परदेशी चलन जप्त केले. पोलिसांनी ही माहिती प्राप्तिकर विभागाला दिली आहे. पोलिसांनी माहीम येथे बुधवारी रात्री संशयावरून एक टॅक्सी थांबवून झडती घेतली असता दोघांकडे तीन कोटी रुपयांचे परदेशी चलन सापडले. व्यवसायातील ही रक्कम बाहेर पाठवणार होतो, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणी आयकर विभाग तपास करत आहे.