धारावीत दोघा लाचखोर पोलिसांसह तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 07:10 IST2020-01-19T07:10:19+5:302020-01-19T07:10:53+5:30
आणखी एक पोलीस कॉन्स्टेबल फरार झाला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धारावीत दोघा लाचखोर पोलिसांसह तिघांना अटक
मुंबई : बिर्याणीच्या हातगाडीवर कारवाई न करण्यासाठी २५ हजारांची लाच घेणाऱ्या धारावी पोलीस ठाण्यातील दोघा पोलिसांसह एका खासगी तरुणाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली, तर आणखी एक पोलीस कॉन्स्टेबल फरार झाला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस नाईक संजय अंकुश तळेकर, कॉन्स्टेबल मुकुंद गजानन शिंदे आणि प्रतिक जितेंद्र मेहेर अशी अटक केलेल्यांची नावे असून, पलायन केलेला पोलीस नाईक संदीप गणेश राणे याचा शोध सुरू असल्याचे एसीबीतील सूत्रांनी सांगितले.
तिघे पोलीस हे धारावी पोलीस ठाण्यात ‘मिल स्पेशल’ म्हणून काम करतात. त्यांच्या वतीने प्रतीक मेहेर हा ‘कलेक्शन’चे काम करतो. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाद्यपदार्थाची हातगाडी लावणाºया एकाकडे त्यांनी ३२ हजार रुपयांची मागणी केली. त्याची पूर्तता न केल्यास कारवाई करण्याची धमकी दिली, नंतर २५ हजारांत तडजोड ठरली.