खळबळजनक! २५ महिलेवर गँगरेप करून हत्या करणाऱ्या तीन आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 21:13 IST2021-04-21T21:12:47+5:302021-04-21T21:13:27+5:30
Gangrape And Murder Case : पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

खळबळजनक! २५ महिलेवर गँगरेप करून हत्या करणाऱ्या तीन आरोपींना अटक
अहमदाबाद - गुजरातमधीलअहमदाबाद जिल्ह्यात एका २५ वर्षीय महिलेवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार करून तिचा खून केल्याचा आरोप आहे. दरम्यान, पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
या महिलेचा मृतदेह १७ एप्रिल रोजी अहमदाबादच्या ओल्ड सिटी भागातून जखमी अवस्थेत सापडला होता. पोलिसांनी तिच्या पतीचा शोध घेतल्यानंतर एक दिवसानंतर मृताची ओळख पटली. शवविच्छेदन अहवालात असे सांगितले गेले आहे की, या महिलेवर अनेक वेळा बलात्कार करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात महिलेच्या डोक्यावर आणि गुप्तांगाला जखम झाल्याचेही निदर्शनास आले आहे.
मृत व तिचा नवरा रोजंदारीवर मजुरी करीत होते असून त्यांना दोन मुले आहेत. पोलिसांनी सांगितले की, तिन्ही आरोपींनी १७ एप्रिल रोजी सकाळी महिला कामावर जात असताना अपहरण केले. आरोपीने तिला एका घरात नेले आणि ड्रग्स दिले व त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि दरम्यान तिचा मृत्यू झाला.