पिंपरी : तरुणीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने आपल्याकडे असलेले खासगी व्हिडीओ सर्वांना दाखवेन, अशी धमकी देत तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंटी दोडमणी ऊर्फ बलवंत दोडमणी, (वय २३, रा. साठे कॉलनी, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दोडमणी आणि तरुणीची मैत्री झाल्यानंतर दोडमणी तिच्याशी जवळीक निर्माण करून प्रेमाविषयी बोलू लागला. यासह शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत शरीरसंबंध ठेवण्याचा आग्रह धरू लागला. त्यास तरुणीने नकार दिला असता तिचा पाठलाग करू लागला. तसेच माझ्याकडे तुझे खासगी व्हिडीओ आहेत. सर्वांना दाखवून तुझी वाट लावेन, अशी धमकी दिली. यातून तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न झाल्याने याप्रकरणी वियनभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.
पिंपरीत खासगी व्हिडीओ व्हायरलची धमकी देत तरुणीचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 19:05 IST
तरुणीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने आपल्याकडे असलेले खासगी व्हिडीओ सर्वांना दाखवेन, अशी धमकी देत तरुणीचा विनयभंग केला.
पिंपरीत खासगी व्हिडीओ व्हायरलची धमकी देत तरुणीचा विनयभंग
ठळक मुद्देयाप्रकरणी वियनभंगाचा गुन्हा दाखल