या घटनेबद्दल वाचल्यानंतर किती विकृत मानसिकतेचे लोक असू शकतात, असा विचार तुमच्या मनात येऊ शकतो. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला तब्बल १२० लोकांना विकले. पत्नीला त्यांच्यासोबत शरीरसंबंध ठेवायला भाग पाडले. ही घटना स्वीडनमध्ये घडली आहे.
एका सरकारी वकिलाने एका व्यक्तीवर आरोप केला आहे की त्याने त्याच्या पत्नीला विकले, अनेक वेळा बलात्कार केला आणि मारहाणही केली. या व्यक्तीने पैसे कमावण्यासाठी पत्नीला १२० लोकांना विकले.
गिझेल पेलिकॉट प्रकरणाची चर्चा
एएफपी वृत्तसंस्थेने याबद्दलचे वृत्त दिले आहे. ही घटना समोर आल्यानंतर स्वीडनमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणाची तुलना फ्रानच्या गिझेल पेलिकॉट या महिलेच्या घटनेशी केली जात आहे. तिचा पती डोमिनिक पेलिकॉट याला २०२४ मध्ये २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली गेली होती.
डोमिनिक यानेही कबूली दिली होती की, त्याने पत्नीला अनेक वेळा नशेचे पदार्थ सेवन करायला लावले. त्यानंतर तिच्यावर इतर पुरुषांना बलात्कार करायला सांगितले.
स्वीडनमधील ही घटना नेमकी काय?
उत्तर स्वीडनमध्ये एका ६२ वर्षीय महिलेने पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने पत्नीला पैसे कमावण्यासाठी वेगवेगळ्या पुरुषांना विकले. त्यांच्यासोबत जबरदस्ती शरीरसंबंध ठेवायला लावले.
दलाली करण्याबरोबरच त्याच्यावर आठ वेळा बलात्कार केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. पतीने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. सरकारी वकील इडा इनरस्टेड यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, महिलेची परिस्थिती वाईट होती. दबाव टाकल्यामुळे तिला शरीरसंबंधासाठी तयार व्हावे लागले.
१२० लोकांची ओळख पटवली
पत्नीने नकार दिल्यानंतर आरोपी तिच्यावर बलात्कार करायचा. आठ वेळा त्याने बलात्कार केल्याचा आरोप केला गेला आहे. या घटना ११ ऑगस्ट २०२२ आणि २१ ऑक्टोबर २०२५ या दरम्यानच्या काळात घडल्या आहेत. या खटल्याची सुनावणी १३ एप्रिलपासून सुरू होणार आहे.
सरकारी वकिलांनी सांगितले की, पोलीस अधिकाऱ्यांनी त्या १२० लोकांची ओळख पटवली आहे. त्यापैकी २६ पुरुषांवर शरीरसंबंधांसाठी स्त्रिया पुरवण्याचे आरोप केले गेले आहेत. इतर लोकांचा तपास सध्या सुरू आहे.
Web Summary : A Swedish man is accused of selling his wife to 120 men, forcing her into sexual acts, and repeated rape. Police identified 120 men; investigations continue, echoing a similar French case.
Web Summary : स्वीडन में एक व्यक्ति पर अपनी पत्नी को 120 पुरुषों को बेचने, यौन संबंध बनाने के लिए मजबूर करने और बार-बार बलात्कार करने का आरोप है। पुलिस ने 120 पुरुषों की पहचान की; जांच जारी है, जो एक समान फ्रांसीसी मामले को दर्शाती है।