राज्यातील तिसरी घटना, सलून व्यवसायिकाने गळफास घेऊन केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 15:11 IST2020-06-15T15:07:54+5:302020-06-15T15:11:08+5:30
याप्रकरणी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राज्यातील तिसरी घटना, सलून व्यवसायिकाने गळफास घेऊन केली आत्महत्या
नागपूर : चंद्रपूर लगतच्या दुर्गापूर येथील समता नगर परिसरात राहणाऱ्या स्वप्निल चौधरी या 27 वर्षीय सलून व्यवसायिक तरुणाने सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. सलून व्यावसायिकाने आत्महत्या करण्याची या आठवड्यातील महाराष्ट्रातील ही तिसरी घटना आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पहिली घटना पुणे तालुक्यातील औंध येथे घडली होती. या घटनेत त्याने स्वतःच्या छातीत खात्री मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दुसरी घटना सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ येथे घडली होती. या घटनेत संबंधित व्यक्तीने लहान मुलाला विष पाजून स्वतःही विष प्राशन केले होते.
अन्य महत्वाच्या बातम्या...
बोहल्यावर चढलेल्या कट्टर नक्षलवादी महिलेस अटक, दोन्ही हाताने चालवते AK-47
अधुरी प्रेम कहानी! GF ला भेटण्यासाठी मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला डॉक्टर; जिवाला मुकला
अनर्थ टळला! दादरमध्ये सुरु होता ४ तास थरार, इमारतीवर चढून पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न
नगरसेवकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या; झोपायला जातो सांगून गेला, अन्...