आता हेच बघायचं बाकी होतं! घरातले मौल्यवान दागिने सोडले अन् गॅस सिलेंडरची टाकी घेऊन चोर पळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 22:41 IST2026-03-23T22:40:24+5:302026-03-23T22:41:00+5:30

विशेष म्हणजे चोरांनी किचनमध्ये ठेवलेल्या अन्य मौल्यवान वस्तूंना हातही लावला नाही. त्यातून हे चोर केवळ गॅस सिलेंडर चोरण्यासाठी आल्याचं निष्पन्न झाले.

Thief flees with a gas cylinder in Prayagraj, Uttar Pradesh | आता हेच बघायचं बाकी होतं! घरातले मौल्यवान दागिने सोडले अन् गॅस सिलेंडरची टाकी घेऊन चोर पळाले

आता हेच बघायचं बाकी होतं! घरातले मौल्यवान दागिने सोडले अन् गॅस सिलेंडरची टाकी घेऊन चोर पळाले

प्रयागराज - मध्य पूर्वेतील युद्धामुळे देशात गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यात आता चोरांनी मौल्यवान दागिन्यांऐवजी गॅस सिलेंडरची चोरी करण्याचं टार्गेट ठेवले आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे एक हैराण करणारा प्रकार समोर आला. याठिकाणी चोर घरातील ज्वेलरी आणि अन्य मौल्यवान वस्तू सोडून केवळ गॅस सिलेंडरची टाकी घेऊन पसार झाले आहेत.

त्रिवेणी बांध परिसरातील ही घटना आहे. याठिकाणी राहणारे ज्ञानचंद्र शनिवारी रात्री जेवल्यानंतर कुटुंबासह झोपी गेले होते. मध्यरात्री अचानक काही चोर त्यांच्या घरात शिरले आणि त्यांनी थेट किचन गाठत घरगुती गॅस सिलेंडरची टाकी घेऊन पसार झाले. सकाळी जेव्हा घरातील लोक उठले तेव्हा गॅस सिलेंडर गायब झाल्याने त्यांना धक्का बसला. विशेष म्हणजे चोरांनी किचनमध्ये ठेवलेल्या अन्य मौल्यवान वस्तूंना हातही लावला नाही. त्यातून हे चोर केवळ गॅस सिलेंडर चोरण्यासाठी आल्याचं निष्पन्न झाले.

२ दिवसांपूर्वी अनेक अडचणीनंतर ज्ञानचंद्र यांनी एजन्सीकडून गॅस सिलेंडरची टाकी मिळवली होती. ही टाकी सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी लोखंडी साखळीही लावली परंतु तरीही चोरांनी ही सिलेंडर टाकी लंपास करण्यात यश मिळवले. हा प्रकार कॉलनीतील लोकांना कळाला तेव्हा सगळेच हैराण झाले. याआधीही प्रयागराजमध्ये अशा घटना समोर आल्या आहेत. जिथे जलालपूर सिकंदरा स्थित पंडित जवाहरलाल नेहरू इंटर कॉलेजच्या स्टोअर रूमचा टाळा तोडून गॅस सिलेंडर आणि अग्निशमन यंत्राच्या साहित्याची चोरी केली. या प्रकरणी गावातील एका आरोपीला अटक केली आणि त्यांच्याकडून चोरी केलेले साहित्य जप्त करण्यात आले.

दरम्यान, ज्ञानचंद्र यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. सातत्याने गॅस सिलेंडर चोरीच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे युद्ध संकटात गॅसचा तुटवडा आणि त्यात सिलेंडर टाकीची चोरी त्यामुळे लोकांना अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 
 

Web Title : अविश्वसनीय! प्रयागराज में चोरों ने गहने छोड़े, गैस सिलेंडर चुराया।

Web Summary : प्रयागराज के निवासी तब चौंक गए जब चोरों ने गहनों को छोड़कर गैस सिलेंडर चुरा लिया। गैस की कमी के बीच, यह असामान्य घटना बढ़ती हताशा को उजागर करती है। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Unbelievable! Thieves Steal Gas Cylinder, Leaving Jewelry Behind in Prayagraj.

Web Summary : Prayagraj residents were shocked when thieves bypassed jewelry to steal a gas cylinder. Amidst gas shortages, this unusual incident highlights rising desperation. Police investigate.