शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

सूटबूट घालून उंची कारमध्ये फिरुन घरफोडी करणारे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 8:22 PM

सूटबूट घालून महागड्या कारमध्ये फिरुन घरफोडी व चोऱ्या करणाऱ्या दोघांना जेरबंद केले

ठळक मुद्देदोन सराईत गुन्हेगारांना अटक :१५ गुन्हे उघड १८ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत 

विमाननगर : सूटबूट घालून महागड्या कारमध्ये फिरुन घरफोडी व चोऱ्यां करणाऱ्या दोघांना येरवडा पोलिसांनीअटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु यांनी दिली. जयवंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (वय ३२,रा.औंधरोड पुणे) व नितिन उर्फ हुबळ्या शंकर जाधव (वय२५,रा.मुंढवा पुणे) या दोघा सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून येरवडा पोलिस स्टेशनकडील १५ गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यातील १८ लाख ४५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दोघाहि आरोपींना २एप्रिल पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलिस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी जयवंत गायकवाड व नितिन जाधव हे येरवड्यात येणार असल्याची खात्रीशीर बातमी येरवडा पोलिसांना मिळाली होती.  त्यांना तात्काळ सापळा रचून येरवडा तपासपथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी मुद्देमालासह जेरबंद केले.जयवंत जाधव याच्यावर पुणे शहर व परिसरातील तब्बल ८८ तर नितिन जाधव वर घरफोडी व चोरीचे १२ गुन्हे दाखल आहेत. येरवडा पोलिस स्टेशनकडील घरफोडीच्या तब्बल १५ गुन्ह्यांची या दोघांनी कबूली दिली. त्यांच्याकडून या गंभीर गुन्ह्यातील रोख रक्कम ९७ हजारासह साडे आठ तोळे सोन्याचे तर दोन तोळे चांदिचे दागिने, सोनी कंपनीचा एलसीडी टिव्ही व  एक शेरओलेट कँप्टिव्हा कार असा सुमारे १८लाख ४५ हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हे दोघेहि आरोपी पुणे शहर व परिसरात कँमेरा नसणाऱ्या ठिकाणी कार पार्क करुन सुट बूट घालून घरफोडीचे गुन्हे करत होते.पेहराव बदलून चोरीच्या महागड्या गाडीत फिरुन कोणताही पुरावा मिळू नये यासाठी सीसीटिव्ही नसणाऱ्या ठिकाणी गाडी पार्क करुन सराईतपणे गुन्हे करत होते. पूर्व विभागाचे अपर पोलिस आयुक्त सुनिल फुलारी,पोलिस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु,येरवडा विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त डाँ.शिवाजी पवार,पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम,गुन्हे निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासपथकाचे प्रमुख मंगेश भांगे,पोलिस कर्मचारी अशोक गवळी ,नवनाथ मोहिते,मनोज कुदळे,पंकज मुसळे, हणमंत जाधव,समिर भोरडे,अजय पडोळे,बाळू बहिरट यांच्या पथकाने या सराईत आरोपींना जेरबंद केले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक