शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये रूम बुक केली, आत जाताच तरुणाने तरुणीवर गोळी झाडली अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 10:18 IST

Crime UP : सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुलगा आणि मुलगी पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांनी आपली ओळखपत्रे देखील जमा केली होती.

उत्तर प्रदेशातील अयोध्येत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील गौरी शंकर पॅलेस होमस्टेमध्ये एक तरुण आणि तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. मृत तरुण-तरुणी प्रियकर-प्रेयसी असल्याचं सांगितलं जात आहे. मृतांची ओळख देवरिया येथील 'आयुष कुमार' आणि बाराबंकीतील दरियाबाद विधानसभा मतदारसंघातील 'अरोमा' अशी पटली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुषने आधी त्याची प्रेमिका अरोमाच्या डोक्यात गोळी मारली आणि नंतर स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. सायंकाळी होमस्टेच्या कर्मचाऱ्यांनी चहासाठी दार वाजवल्यावर या घटनेची माहिती समोर आली. बराच वेळ दार न उघडल्याने पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून फॉरेन्सिक टीमच्या उपस्थितीत दरवाजा तोडला असता, तरुण-तरुणीचे रक्ताने माखलेले मृतदेह आढळले. पोलिसांच्या माहितीनुसार, खोलीत एक बेकायदेशीर पिस्तूल आणि दोन काडतुसेही सापडली आहेत. दोघांच्याही डोक्यात गोळी लागली होती.

व्हिडीओग्राफी करत उघडला दरवाजाएसपी सिटी चक्रपाणि त्रिपाठी यांनी सांगितलं की, गौरी शंकर पॅलेसमध्ये तरुण-तरुणी थांबले होते. हॉटेलने माहिती दिली की, आतून खोली बंद आहे आणि दार वाजवूनही ते उघडत नाहीयेत. त्यामुळे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि व्हिडीओग्राफी करत दरवाजा उघडला. दोघांनाही गोळी लागल्याच्या जखमा आढळल्या आहेत. एसपी सिटीच्या मते, दोघांनीही स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे.

पती-पत्नी असल्याचं सांगून थांबले होते दोघे!गौरीशंकर पॅलेसचे मालक हेमंत जयस्वाल यांनी सांगितलं की, सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुलगा आणि मुलगी पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांनी आपली ओळखपत्रे (आयडी) देखील जमा केली होती. १२ वाजेपर्यंत हे लोक बाहेर पडले आणि नंतर रूममध्ये गेल्यानंतर बाहेर आले नाहीत. सायंकाळी मी हॉटेलमध्ये आलो, तेव्हा माझ्या कर्मचाऱ्यांना चहा विचारण्यासाठी जायला सांगितलं. जेव्हा कर्मचाऱ्यांनी जाऊन दार वाजवलं, तेव्हा खोलीचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दार वाजवूनही न उघडल्याने पोलिसांना सूचना देण्यात आली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले.

अयोध्येत सध्या हिंदू होमस्टेची संख्या मोठी आहे. ज्या होमस्टेमधून हे मृतदेह सापडले आहेत, तो एका भाजप नेत्याचा असल्याचं सांगितलं जात आहे. आता या घटनेनंतर काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. गौरी शंकर गेस्ट हाऊसमध्ये केवळ मुलाचं आयडी घेऊन रूम कशी दिली गेली आणि मुलीचं आयडी का घेतलं नाही? विशेष म्हणजे, तरुण-तरुणी दोघांचंही वय कमी होतं. याव्यतिरिक्त, गोळी झाडल्याचा आवाज कोणालाच कसा ऐकू आला नाही, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहार