गाडी आडवी का घातली यावरून झाला वाद; डोक्यात तीन वेळा दगड मारून केले गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 19:53 IST2020-10-27T19:52:22+5:302020-10-27T19:53:03+5:30
तू मला दुचाकी आडवी का घातली. तुला माहीत नाही का मी इथला भाई आहे...

गाडी आडवी का घातली यावरून झाला वाद; डोक्यात तीन वेळा दगड मारून केले गंभीर जखमी
पिंपरी : गाडी आडवी का घातली यावरून वाद काढून एका टोळक्याने दुचाकीस्वारावर दगडाने हल्ला करून डोक्यात तीन वेळा दगड घालून गंभीर जखमी केल्याची घटना तळवडे येथे घडली. या प्रकरणी चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून एका अल्पवयीन मुलासह तिघांना अटक केली आहे.झाला
दीपक बाळू धोत्रे (वय २६, रा. राहुल नगर ओटा स्किम, निगडी) टोळक्याच्या हल्ल्यात जखमी झाले. आकाश उर्फ घोडा, अमर हिरनायक (वय २३, बौद्धनगर, ओटा स्किम निगडी), अरुण भातपुते (वय २३, रा. रुपी हाऊसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे) आणि एका सोळा वर्षीय मुलाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हिरनायक, भातपुते आणि अल्पवयीन मुलास पोलिसांनी अटक केली.
फिर्यादी दीपक धोत्रे २५ ऑक्टोबरला रात्री साडेआठच्या सुमारास मित्र मनोज धोत्रे यांच्या बरोबर दुचाकीवरून घरी चालले होते. वस्तीतील गल्ली बोलतील रस्त्यातून जात असताना समोर अचानक एक दुचाकी आली. त्या दुचाकीवर बसलेल्या आकाशने तू मला दुचाकी आडवी का घातली. तुला माहीत नाही का मी इथला भाई आहे. त्यावेळी त्यांच्या बरोबर असलेल्या एकाने फिर्यादीच्या चेहऱ्यावर ठोसा मारला. दिघे घाबरून पळत असताना आरोपींनी त्यांच्यावर दगडफेक केली. फिर्यादीला पाठीला दगड लागले. त्यानंत आकाशने फिर्यादिला गाठत डोक्यात तीन वेळा दगड मारून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.