समीर वानखेडे हेरगिरी प्रकरणात तथ्य नाही; असं म्हणतात पोलीस महासंचालक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 09:17 PM2021-10-24T21:17:52+5:302021-10-24T21:18:54+5:30

Sameer Wankhede : गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांचे पोलीस पाळत ठेवत असल्याची तक्रार मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केली होती.  

There is no fact in Sameer Wankhede spying case; That is what the Director General of Police says | समीर वानखेडे हेरगिरी प्रकरणात तथ्य नाही; असं म्हणतात पोलीस महासंचालक

समीर वानखेडे हेरगिरी प्रकरणात तथ्य नाही; असं म्हणतात पोलीस महासंचालक

Next
ठळक मुद्देवानखेडे यांनी केलेल्या आरोपांत तथ्य नसल्याचं संजय पांडे यांनी म्हटले आहे. 

एनसीबीचे मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मुंबईपोलिसांच्या साध्या वेशातील पोलिसांकडून हेरगिरी केल्याप्रकरणी वानखेडे यांनी तक्रार मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे काही दिवसांपूर्वी सादर केले होते. तसेच त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना देखील तक्रार केली होती. मात्र, वानखेडे यांनी केलेल्या आरोपांत तथ्य नसल्याचं संजय पांडे यांनी म्हटले आहे. 

वानखेडे यांच्या तक्रारीनुसार अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाच्या पोलिसाला याप्रकरणी चौकशी करण्यास सांगून अहवाल सादर करण्यास सांगितले असल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली होती. 

नवाब मलिक म्हणतात, समीर वानखेडे यांना लक्ष्य केलं म्हणून मला धमकीचा फोन आला

Sameer Wankhede : समीर वानखेडे यांच्या नावाने बोगस ट्विटर अकाउंट

२ ऑक्टोबरला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) मुंबईच्या खोल समुद्रात क्रूझवर रेव्ह पार्टी (Cruise Rave Party) करताना पकडण्यात आले होते. यावरून राज्य सरकार आणि एनसीबीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आर्यन खानकडे ड्रग सापडलेले नसताना त्याला अटक करण्यात आली आणि त्यांचे लक्ष्य शाहरुख असल्याचा आरोप राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. यावर आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. (mumbai cruise rave party case)

ओशिवारा पोलिसांनी स्मशानात जात असताना समीर वानखेडे यांचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. वानखेडे यांच्या आईचे २०१५ मध्ये निधन झाले आहे. तेव्हा पासून ते या ठिकाणी जातात, असे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांचे पोलीस पाळत ठेवत असल्याची तक्रार मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केली होती.  

Web Title: There is no fact in Sameer Wankhede spying case; That is what the Director General of Police says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.