Sameer Wankhede : समीर वानखेडे यांच्या नावाने बोगस ट्विटर अकाउंट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 04:57 PM2021-10-24T16:57:28+5:302021-10-24T16:58:23+5:30

Sameer wankhede : सुरुवातीला या अकाऊंच्या 'डीपी'मध्ये एनसीबीचा लोगो होता.

Bogus Twitter account in the name of Sameer Wankhede | Sameer Wankhede : समीर वानखेडे यांच्या नावाने बोगस ट्विटर अकाउंट

Sameer Wankhede : समीर वानखेडे यांच्या नावाने बोगस ट्विटर अकाउंट

Next
ठळक मुद्देहे अकाउंट एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे नसून त्यांना समर्थन देणाऱ्याचे आहे, असेही स्पष्ट करण्यात आले. दरम्यान हे अकाऊंट बनावट असल्याची माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे.  

ड्रग्जविरोधी कारवाईमुळे चर्चेत आलेल्या NCBचे मुंबई विभागीय झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नावे बनावट ट्विटर अकाऊंट उघडण्यात आलं आहे. या अकाऊंटवरून वांद्रे परिसरात छापेमारी केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नवाब मलिकांशी संबंधित वादावरही चर्चा करण्यात आली आहे. शनिवारी संध्याकाळी हे अकाऊंट सुरु झालं. याबाबत समीर वानखेडे यांनी या अकाउंटवरून मिळणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नका असं सांगितलं आहे. 

सुरुवातीला या अकाऊंच्या 'डीपी'मध्ये एनसीबीचा लोगो होता. मात्र काही वेळानंतर त्यात बदल करण्यात आला. एनसीबी लोगोऐवजी 'नो ड्रग्स' असा डीपी ठेवण्यात आला. तसेच हे अकाउंट एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे नसून त्यांना समर्थन देणाऱ्याचे आहे, असेही स्पष्ट करण्यात आले. दरम्यान हे अकाऊंट बनावट असल्याची माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे.  

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे ड्रग्जविरोधी कारवाईने चर्चेत आले आहेत. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्स पार्टीप्रकरणी अटकेनंतर ते चर्चेचा विषय बनले आहेत. आर्यननंतर आता अभिनेत्री अनन्या पांडे देखील एनसीबीच्या रडारवर आहे.  नन्याची देखील ड्रग्स प्रकरणी २ वेळा चौकशी करण्यात आली आहे. चौकशीसाठी अनन्याला  उशिर झाल्यामुळे समीर वानखेडे यांना तिला झापलं होतं. आता अनन्याला पुन्हा सोमवारी चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलावलं आहे. तसेच दुसरीकडे २६ ऑक्टोबरला आर्यनच्या जामीन अर्जावर सुरूवात होणार आहे.

Web Title: Bogus Twitter account in the name of Sameer Wankhede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.