पिंपरी : पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने आणि रोकड असा सव्वापाच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. कात्रज-निगडी दरम्यानच्या प्रवासात रविवारी (दि. १९) हा प्रकार घडला. निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अंकिता नितेश साबळे (वय २५, रा. देहूगाव) यांनी मंगळवारी (दि. २१) फिर्याद दिली आहे. दोन महिलांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. अंकिता साबळे आणि त्यांच्या आई रविवारी (दि. १९) सकाळी साडेअकराच्या सुमारास कात्रज-दरम्यान पीएमपी बसने प्रवास करीत होत्या. त्यावेळी त्यांच्या आईकडे असलेल्या पर्समध्ये सोन्याच्या दागिन्यांची दोन लहान पाकिटे आणि रोख रक्कमकेचे पाकिट होते. यात २१३ ग्रॅम सोन्याचे दागिने होते. रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा पाच लाख ३५ हजार ७०० रुपयांचा ऐवज त्यात होता. दोन महिला आणि एका चोरट्याने नजर चुकवून हा ऐवज लंपास केला. निगडी पोलीस तपास करत आहेत.
प्रवासी महिलेच्या पर्समधील सव्वापाच लाखांचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 16:06 IST
महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने आणि रोकड असा सव्वापाच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला
प्रवासी महिलेच्या पर्समधील सव्वापाच लाखांचा ऐवज लंपास
ठळक मुद्देदोन महिलांसह तिघांवर गुन्हा दाखल