शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

आमदार पीएच्या घरात चोरी, भावोजीच्या पैशावर मेहुण्याने मारला डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 20:05 IST

तीन महिन्यांनी गुन्हा उघडकीस, दोघांना अटक

ठळक मुद्देया प्रकरणी मेहुण्यासह त्याचा साथीदाराला अटक करण्यात आली असून दोघांकडून रोकडही जप्त करण्यात आली आहे.या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. या दोघाकडील चोरीची ७० हजाराची रोकडही पोलिसांनी जप्त केली आहे.

सांगली : आमदारांचे पीए असलेल्या भाऊजीच्या घरावर मेहुण्यानेच डल्ला मारत ७० हजाराची रोकड लंपास केली होती. तीन महिन्यानंतर या चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. या प्रकरणी मेहुण्यासह त्याचा साथीदाराला अटक करण्यात आली असून दोघांकडून रोकडही जप्त करण्यात आली आहे.

निर्मलकुमार उर्फ बबन बापूसाहेब गायकवाड (वय २७ रा. ढवळी, ता. मिरज) व दीपक बाळासाहेब पाटील (३१, रा. बेडग, ता. मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील निर्मलकुमार हा भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांचे स्वीय सहाय्यक अमोल कणसे यांचा मेहुणा आहे. या चोरीप्रकरणी कणसे यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली होती.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कणसे यांच्या घरात पैसे असल्याची माहिती निर्मलकुमार याला होती. त्याने हे पैसे चोरण्याचा प्लॅन केला. त्यासाठी त्याचा मित्र दीपक पाटील यालाही बरोबर घेतले. रंगपंचमीदिवशी १३ मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास कणसे यांच्या घरात कोणी नसल्याचे पाहून या दोघांनी घराचे कुलुप लोखंडी कटावणीने तोडून घरात प्रवेश केला. घराच्या कपाटातील ७० हजाराची रोकड घेऊन दोघांनी पलायन केले. या चोरीबाबत विश्रामबाग पोलिसांत नोंद झाली होती.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, हेड कॉन्टेबल अमित परीट, मेघराज रुपनर, आमसिद्धा खोत, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी, विकास भोसले, अजय बेंद्रे यांचे पथक रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा शोध घेत असताना कणसे यांच्या घरी झालेल्या चोरीबाबत माहिती मिळाली. पथकाने निर्मलकुमार गायकवाड व दीपक पाटील या दोघांना मिरजेतील डॉ. चिवटे रुग्णालयाजवळून ताब्यात घेतले. या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. या दोघाकडील चोरीची ७० हजाराची रोकडही पोलिसांनी जप्त केली आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

तब्बल २२५ कोटींची केली कर चुकवेगिरी, ठग उद्योगपतीला मुंबईतून अटक

 

अखेर बदला घेतला! सरपंचाची हत्या केलेल्या हिजबुलच्या टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा 

 

लॉकडाऊनमध्ये बाईक जप्त केल्याने गेली नोकरी अन् उचलले टोकाचे पाऊल 

 

डॉक्टर पतीला पत्नीने चप्पलेने हाणलं, महिला वकिलासोबत एकत्र पाहिल्याने राग झाला अनावर 

 

कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची नागपूरला बदली

 

पाकचा बुरखा फाडला! ‘हनीट्रॅप’ करणारी ती' हाफिज सईदच्या होती संपर्कात

 

बकरी चोरली म्हणून युवकाला नग्न करून मारहाण, पैशांची मागणी करत बनवला व्हिडीओ

 

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येवर देशभरात चर्चा, SCनंही मानसिक आजाराबाबत केला सवाल

टॅग्स :RobberyचोरीMLAआमदारSangliसांगलीPoliceपोलिस