भिवंडीत ज्वेलर्स दुकानात चोरी; चोरटे सीसीटीव्हीत कैद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 17:06 IST2021-07-10T17:04:45+5:302021-07-10T17:06:20+5:30

Bhiwandi News: ठाणे भिवंडी रस्त्यावरील पुर्णा या गावातील बाजारपेठेत सुनील भगत यांच्या मालकीचे घरा जवळील इमारतीत भगत ज्वेलर्स नावाचे सोन्याचांदीचे दागिने विक्री चे दुकान आहे.

Theft at a jeweller's shop in Bhiwandi; Captured on stolen CCTV | भिवंडीत ज्वेलर्स दुकानात चोरी; चोरटे सीसीटीव्हीत कैद 

भिवंडीत ज्वेलर्स दुकानात चोरी; चोरटे सीसीटीव्हीत कैद 

- नितिन पंडीत
भिवंडी  - भिवंडी तालुक्यातील पुर्णा या गावात असलेल्या भगत ज्वेलर्स या सोन्याच्या ज्वेलर्स दुकानात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना घडली आहे .दरम्यान चोरी करणारे दोन चोरटे ज्वेलर्स दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. 

  ठाणे भिवंडी रस्त्यावरील पुर्णा या गावातील बाजारपेठेत सुनील भगत यांच्या मालकीचे घरा जवळील इमारतीत भगत ज्वेलर्स नावाचे सोन्याचांदीचे दागिने विक्री चे दुकान असून शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या दोन चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला व दुकानातील शोकेस मध्ये लावलेले अडीच किलो वजनाचे चांदी व ११ ग्रॅम सोन्याचे दागिने व सहा हजार रोख रक्कम घेऊन पोबारा केलं आहे . 

 चोरटे दुकानात शिरताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून परंतु त्यापैकी एकाने रेनकोट तर एकाने छत्री च्या सहाय्याने स्वतःचा सीसीटीव्ही च्या कॅमेरा पासून बचाव करीत दुकानात चोरी केली आहे . या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांसह पोलीस पथक तापासकामी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले . या घरफोडीत सुमारे एक लाख पंच्यांणव हजार म्हणजे सुमारे दोन लाख रुपयांचे दागिने चोरी झाले असून प्रकरणी वनिता सुनील भगत यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे करीत आहेत. 

Web Title: Theft at a jeweller's shop in Bhiwandi; Captured on stolen CCTV