शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पुण्यात घरफोडीचे सत्र संपता संपेना : नागरिकांच्या डोकेदुखीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 4:50 PM

मागील काही महिन्यांपासून घरफोडी, दरोड्याच्या घटना वाढल्या आहेत. 

ठळक मुद्देपोलीस प्रशासनाचे काही चालेना

पुणे : सरासरी दिवसाला तीन ते चार घरफोडीच्या घटना शहरात होत आहेत. यावर नागरिक  त्रस्त झाले असून त्यांनी पोलीस प्रशासनाकडे यावर गुन्हेगारांना पकडण्याचे व त्यांना कडक शासन करण्याचे आवाहन केले आहे. मागील काही महिन्यांपासून घरफोडी, दरोड्याच्या घटना वाढल्या असून यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. शहर व उपनगरांमध्ये सातत्याने वाढणाºया या घटनांविरोधात तातडीने उपाययोजनेची पावले पोलिसांकडून उचलली जावीत, अशी अपेक्षा नागरिक बाळगून आहेत. १७ ते १८ ऑगस्ट रोजी दरम्यान सकाळी सहाच्या सुमारास डीपी रस्त्यावरील सुजल अपार्टमेंटमध्ये एका अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करुन १ लाख १५ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच सोने व हि-याचे दागिने असा एकूण ४ लाख ८२ हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. फ्लॅटला कुलूप असताना देखील चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटवून घरात शिरुन चोरी केली. याबाबत शेखर तेंडूलकर (वय ५७, रा. एरंडवणा, कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पोलीस उपनिरीक्षक एस के गोरे करीत आहेत. घरफोडीची दुसरी घटना डहाणूकर कॉलनी येथील नवरंग अपार्टमेंट येथे घडली. याप्रकरणी ५२ वर्षीय एका महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. या घटनेत चोरट्याने घराचा मुख्य दरवाजाला असलेले कुलूप तोडून घरात घुसून २ लाख २७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यु. एच. माळी हे करीत आहेत. केवळ शहरांमध्येच नव्हे तर उपनगरांमध्ये देखील घरफोड्यांचे सत्र सुरुच आहे. यावर पोलिसांकडून तत्परतेने कारवाई होत नसल्याचे दिसून आले आहे. पोलिस प्रशासनाने यावर नागरिकांना आपआपल्या सोसायट्यामध्ये सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन केले आहे. यामुळे चोरांचा माग काढणे शक्य असून त्याव्दारे फिर्यादीची गेलेली रक्कम काही अंशी मिळण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी