शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

कामशेत व परिसरात दरोडा घालण्यासाठी आलेली टोळी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 4:14 PM

कामशेत गावच्या हद्दीत जुना मुंबई- पुणे महामार्गावर एका ढाब्याच्या जवळ दरोड्यांच्या तयारीत असल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळाली होती.

कामशेत : जुना मुंबई-पुणे महामार्गावर कामशेत खिंडीच्या अलीकडे सापळा रचून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी कामशेत पोलिसांनी जेरबंद केली. चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे.कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार (दि.१८ ) रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक बी. बी. पाटील, सहायक फोजदार दत्तात्रय खंडागळे, पोलीस हवालदार अजय दरेकर, पोलीस नाईक शिंदे हे कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पांढऱ्या रंगाचे होंडा अमेझ करमधून काही लोक कामशेत गावच्या हद्दीत जुना मुंबई- पुणे महामार्गावर एका ढाब्याच्या जवळ दरोड्यांच्या तयारीत असल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळाली. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे ५.१५ वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे लेन वर कामशेत खिंडीच्या अलीकडे नाकाबंदी करून चार जणांना ताब्यात घेतले. यात बाबू हुसेन शेख ( वय ३६ रा. वाशी मुंबई ), जितेंद्र अमल सरोज उर्फ मनीश ( वय १९ रा. वाशी मुंबई ), उमेश बाबुराव गायकवाड ( वय १५ रा. वाशी मुंबई ), चांद दत्ता राणे ( वय १४ रा. वाशी मुंबई)यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी पाचवा गुरू ( पूर्ण नाव माहीत नाही ) हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. कामशेत व आजूबाजूच्या परिसरात दरोड्यांच्या तयारीत असलेल्या या टोळीकडून लोखंडी तलवार, लोखंडी रॉड, लाल मिरचीची पावडर, घातक हत्यारे आणि होंडा अमेझ कार असा एकूण ४००३९५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे करीत आहेत.

टॅग्स :kamshetकामशेतCrime Newsगुन्हेगारीThiefचोरPoliceपोलिसArrestअटक