शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

पुणे येथे टेकडीवर फिरायला गेलेल्या युवक,युवतीला चाकूचा धाक दाखवून लुबाडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 2:51 PM

हनुमान टेकडी परिसरात फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन युवक आणि युवतीला धमकावून त्यांच्याकडील २८ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून नेण्यात आला आहे.

ठळक मुद्देयाबाबत १८ वर्षाच्या महाविद्यालयीन युवतीने डेक्कन पोलीस ठाण्यात दिली फिर्याद

पुणे : हनुमान टेकडी परिसरात फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन युवक आणि युवतीला धमकावून त्यांच्याकडील दागिने आणि २ मोबाईल असा २८ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची शनिवारी दुपारी घडली. चोरट्यांनी महाविद्याालयीन युवतीला लुटल्याची घटना उघडकीस आल्यानंतर डेक्कन तसेच चतु:शृंगी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. याबाबत  १८ वर्षाच्या महाविद्याालयीन युवतीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयीन युवती आणि तिचा मित्र शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास हनुमान टेकडी भागात फिरायला गेले होते. त्या वेळी दोन चोरट्यांनी त्यांना अडवले आणि धमकावण्यास सुरुवात केली. चोरट्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. युवतीकडील सोन्याच्या रिंगा आणि मोबाईल तसेच तिच्या मित्राकडील मोबाईल असा २८ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला़  त्यानंतर चोरटे टेकडीवरून पसार झाले. घाबरलेल्या युवक आणि युवतीने थेट घरी गेले़ डेक्कन पोलिसांकडे रविवारी दुपारी त्यांनी येऊन आपल्यावर घडलेल्या प्रसंगाची माहिती पोलिसांना दिली.यापूर्वी हनुमान टेकडीवर फिरायला येणाऱ्या युगलांना धाक दाखवून लुबाडण्याच्या घटना जानेवारी तसेच फेब्रुवारी २०१६ मध्ये घडल्या होत्या़. त्यातील चोरट्यांना पोलिसांनी अटक केली होती़ त्यानंतर आता पुन्हा हनुमान टेकडीवर दुपारी फिरायला गेलेल्या युवक-युवतींना लुबाडण्याची घटना घडली आहे़. डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल कोलंबीकर अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस