शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

छत्री खरेदीच्या बहाण्याने 'असा ' घातला १ लाख ६५ हजारांना गंडा,पुण्यातल्या सहकारनगरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 15:57 IST

एका छत्री विक्रेत्याला बोलण्यात गुंतवून तिघांनी चक्क पावणे दोन लाख लंपास केले.

पुणे : पाऊस कधीही पडेल असे वातावरण होते. अशा दुपारच्यावेळी एक जण दुकानात येतो छत्री खरेदी करण्याचा बहाणा करुन दुकानाच्या बाहेरच्या बाजूला लावलेल्या छत्र्या दाखविण्यासाठी दुकानदाराला बोलावतात. काही वेळाने तो निघून जातो.दरम्यान, दुकानदाराच्या गल्ल्यातील १ लाख ६५ हजार रुपये व पाऊच लंपास झालेले असतो. सहकारनगर नंबर २ मधील गोळवलकर पथावरील तुलसी व्हरायटीमध्ये रविवारी दुपारी सव्वा तीन वाजता हा प्रकार घडला.याप्रकरणी महेंद्र चौधरी (वय २१,रा. धनकवडी) यांनी दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी यांचे तुलसी व्हरायटी हे दुकान आहे़ दुकानाच्या बाहेर विक्रीसाठी छत्र्या टांगून ठेवलेल्या असतात. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास एक जण छत्री खरेदी करण्यासाठी आला. त्याने चौधरी यांना वेगवेगळ्या छत्र्या उघडून दाखविण्यास सांगितल्या. चौधरी यांना बाजूचे दिसणार नाही, अशा पद्धतीने छत्री उघडून त्यांच्यासमोर धरली.त्याचवेळी त्याचा दुसरा साथीदार दुकानाच्या आत गेला.  त्याने गल्ल्याच्या खालील कप्यामधून १ लाख ६५ हजार रुपये व पाऊच काढून घेतला़ दरम्यान चौधरी यांचा भाऊ लघुशंकेसाठी तो परत येत होता. तेव्हा त्याला तिसऱ्याने वाटेतच अडविले व हा रस्ता कोठे जातो, अशी चौकशी करत बोलण्यात गुंतविले. इकडे पहिली व्यक्ती छत्री न घेताच परत गेली. त्यानंतर महेंद्र चौधरी हे परत आपल्या जागेवर येऊन बसले.काही वेळाने त्यांना गल्ल्यातील पैसे व पाऊच लंपास झाल्याचे लक्षात आले. पाऊचमध्ये वडिलांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, स्टेट बँक व बँक आॅफ इंडियाचे एटीएम कार्ड, दुचाकीचे ड्रायव्हिंग लायसन्स अशा वस्तू होत्या. यासाठी आपल्या त्यांच्याच साथीदारांनी दुकानात येऊ नये, म्हणून रस्ता विचारण्याचा बहाणा केल्याचे त्यांच्या भावाच्या लक्षात आले. या ठिकाणी सीसीटीव्ही आढळून आले नाहीत. पोलीस हवालदार एन. पी.पवार अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेSahakar NagarसहकारनगरCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिसRainपाऊस