खळबळजनक! महिलेचा खून करून बेडमध्ये ठेवला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 14:02 IST2024-11-09T14:01:26+5:302024-11-09T14:02:46+5:30
पती बाहेर गावी गेले असता पत्नीचा कोणीतरी खून करून घरातील बेडमध्ये ठेवल्याची घटना फुरसुंगी येथे उघडकीस आली आहे.

खळबळजनक! महिलेचा खून करून बेडमध्ये ठेवला मृतदेह
पती बाहेर गावी गेले असता पत्नीचा कोणीतरी खून करून घरातील बेडमध्ये ठेवल्याची घटना फुरसुंगी येथे उघडकीस आली आहे. स्वप्नाली उमेश पवार ( रा. हुंडेकर वस्ती फुरसुंगी ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. महिला राहत्या घरी बेडमध्ये बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याचा नियंत्रण कक्ष येथून फुरसुंगी बिट मार्शल यांना समजले असता घटनास्थळी अधिकारी विनोद पवार, सपोनी जाधव, पोलीस उपनिरीक्षक खंदारे भेट दिली.
महिलेचा पती नामे उमेश पवार ( वय 36 वर्ष ) रा. लव्हेगाव पो अकुलगाव ता माढा जि सोलापुर याच्याकडे चौकशी केली. तो उबेरमध्ये चालक असून त्यास ८ नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजता केज येथील भाडे आल्याने निघून गेला होता. रात्री तो घरी आला असता त्याच्या घराला बाहेरून कडी होती. त्याने आतमध्ये शोध घेतला असता त्याला पत्नी सापडली नाही. त्यानंतर त्याने मोटरसायकलवरून त्याच्या पत्नीचा हडपसर परिसरात शोध घेतला.
पतीने घरातील दागिने व पैसे, त्याच्या पत्नीचा मोबाईल पाहिला पण काहीच सापडलं नाही. त्यानंतर त्याने त्याचे घरातील दागिने व सोने बेडमध्ये आहे का हे पाहण्यासाठी बेड उघडला असता त्यामध्ये त्याची पत्नी बेशुद्ध अवस्थेत मिळून आली. त्याने नियंत्रण पक्षाला कॉल केला होता. अधिक तपास फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे करीत आहेत.