जवानासोबत हॉटेलमध्ये होती लष्करातील माजी अधिकाऱ्याची पत्नी, पतीने रंगेहात पकडले, नंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 21:26 IST2023-01-11T21:26:17+5:302023-01-11T21:26:41+5:30
Extra Marital Affairs: बीएसएफमधील रिटायर्ड असिस्टंट कमांडेंट पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत हॉटेलच्या खोलीमध्ये रंगेहात पकडले. या महिलेचा प्रियकरसुद्धा लष्करामध्ये असल्याची माहिती समोर येत आहे.

जवानासोबत हॉटेलमध्ये होती लष्करातील माजी अधिकाऱ्याची पत्नी, पतीने रंगेहात पकडले, नंतर...
बीएसएफमधील रिटायर्ड असिस्टंट कमांडेंट पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत हॉटेलच्या खोलीमध्ये रंगेहात पकडले. या महिलेचा प्रियकरसुद्धा लष्करामध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी रिटायर्ड असिस्टंट कमांडंट आपल्या काही मित्रांसह हॉटेलमध्ये पोहोचला. तिथे त्याने या दोघांनाही रंगेहात पकडले.
हे प्रकरण उत्तराखंडमधील रुडकी येथील आहे. येथे बराचवेळ हॉटेलमध्ये गोंधळ होत होता. दरम्यान, आपल्या पत्नीचे अनेक जणांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप पतीने केला आहेत. तसेच परपुरुषांसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करतानाचे पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडीओ आपल्याकडे असल्याचा दावाही पतीने केला आहे.
उत्तराखंडमधील रुडकी येथील गंगनगर येथील एका हॉटेलमध्ये सकाळी हा हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. बीएसएफमधून निवृत्त झालेले असिस्टंट कमांडेट सुधीर त्यांच्या काही सहकाऱ्यांसह हॉटेलमध्ये पोहोचले. तिथे सुधीरने त्याच्या पत्नीला लष्करातील एका जवानासोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडले. पतीला खोलीत शिरलेले पाहून पत्नी गडबडली. त्यामुळे हॉटेलमध्येही गोंधळ झाला. पती सुधीर आणि त्याच्या मित्रांनी व्हिडीओ रेकॉर्ड केला.
त्यानंतर हॉटेलमध्ये बराच गोंधळ झाला. पतीने पत्नीच्या चरित्रावर गंभीर आरोप केले. दरम्यान, पत्नी सुधीरसोबत वाद घालत होती. दरम्यान, पती सुधीरने सांगितले की, त्याच्या पत्नीचे अनेक जणांसोबत अनैतिक संबंध आहेत. जेव्हा मी तिला विरोध केला, तेव्हा पत्नीने मला खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. आज मीच तिला रंगेहात पकडले. माझ्याकडे माझ्या पत्नीचे अनेक व्हिडीओ आहेत. त्यामध्ये ती अनेक पुरुषांसोबत दिसत आहे, असा दावाही त्याने केला.
सुधीरने पुढे सांगितले की, आमचा विवाह २०१७ मध्ये झाला होता. त्यानंतर वाद झाल्याने मी तिच्यापासून वेगळा राहत होते. तसेच आमच्या घटस्फोटाची केस कोर्टामध्ये सुरू आहे.